[rank_math_breadcrumb]

ह्या स्टारने डान्स रियालिटी शोचा ट्रेंड बदलले, आणि खऱ्या टॅलेंटला दिली ओळख

रेमो डिसूझा हे एक डान्सर, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. जवळजवळ त्यांनी 25 वर्षां पेक्षा इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. आज पर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्यांनी ‘डान्स प्लस’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये सलग सात सीझनसाठी परीक्षक म्हणूनही काम केले आहे. तसेच अनेक लोकांचे ते रोल माॅडेल आहेत.  डान्स रिॲलिटी शो मध्ये हि त्यानी अनेक बदल त्यानी घडवला, आणि त्यामुळे हा शो लोकप्रिय झाला. 

भारतातील डान्स रिॲलिटी शोचा ट्रेंड बदलण्यात रेमो डिसूझाने मोठी भूमिका बजावली. पूर्वी, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अनेक शो पूर्वनियोजित क्षण, भावनिक पार्श्वकथा आणि कधीकधी स्पर्धकांच्या अतिरंजित प्रवासावर जास्त लक्ष केंद्रित करत असत. तर या शो साठी त्यानी उत्तम बदल घडवत ते या ‘डान्स प्लस’ सारख्या शोचा एक ओळख बनले आहेत. या बदलामुळे अनेक प्रेक्षक पुन्हा डान्स रिॲलिटी शो पाहू लागले. तसेच चांगल्या कलाकरांना स्टेज मिळाला, आणि त्यातील अनेक कलाकार या क्षेत्रात खुप मोठे झाले आहेत. ते म्हणजे धर्मेश येलांदे, राघव जुयाल, पुनित पाठक, शक्ती मोहन, सलमान युसूफ खान हे कलाकार आहेत. आणि अनेक कलाकार हि आज तयार होत आहेत.

रेमो (remo)डिसूझा आपल्या डान्स रिॲलिटी शोजच्या माध्यमातून अस्सल प्रतिभेला ओळखण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी नेहमीच शुद्ध नृत्य कौशल्य, सर्जनशीलता आणि मौलिकतेला प्राधान्य दिले आहे. त्यांनी अनोख्या नृत्यशैलींनाही प्रोत्साहन दिले. मंचावर काहीतरी नवीन सादर करणाऱ्या स्पर्धकांना संधी दिली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

13 वर्षांत ‘महाभारत’मधील छोटा कृष्णचा जबरदस्त ट्रान्सफॉर्म, आता दिसतो हँडसम हंक