80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर अशाच 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय पौराणिक मालिका ‘महाभारत’ यातुन अभिनेता चेतन हंसराजने बी. आर. चोप्रा आपल्या कार्यास सुरुवात केली होती.
अभिनेता चेतन हंसराजने (Chetan hansrajne) बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत अवघ्या 14 वर्षांच्या वयात त्याने या मालिकेत तरुण बलरामची भूमिका साकारली होती. काही वर्षांपूर्वी, चेतनने हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यात त्याने एक व्हिडिओ क्लिप पोस्ट करून चाहत्यांना त्याला ओळखण्याचे आव्हान दिले होते. त्याच्या पहिल्याच प्रोजेक्टने त्याला घराघरात पोहोचवले, ही एक जादूच होती. विशेष म्हणजे, 1988 मध्ये त्याने तरुण बलरामची भूमिका साकारली होती, तर जवळपास 15 वर्षांनंतर त्याला एकता कपूरच्या ‘महाभारत’ आवृत्तीमध्ये भीमाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
चेतन आता 53 वर्षांचा आहे. पूर्वीच्या तुलनेत त्याची शरीरयष्टी पूर्णपणे बदलली आहे. चेतन फिटनेसचा चाहता असून आनंदी जीवन जगत आहे. 2004 मध्ये, त्याने मॉडेल, ॲथलीट आणि डिझायनर असलेल्या लॅविनिया परिराशी लग्न केले. ती सुद्धा चेतनप्रमाणेच फिटनेसची चाहती आहे आणि त्या दोघांची जोडी खूप छान जमली आहे. त्यांना अथेन्स हंसराज नावाचा एक मुलगा आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अक्षय कुमार अभिनीत ‘भूत बंगला’ चित्रपटाच्या एडवांस बुकिंगला झाली सुरूवात









