चित्रपटसृष्टी मध्ये चित्रपट जेवढे गाजतात आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. मालिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून रोजच्या मनोरंजनातील भाग बनलेले असतात. आतापर्यंत अनेक मालिका आल्या आहेत ते म्हणजे अनुपमा,बालिकावधू, दिया और बाती हम, असे बरेच मालिका सासु सुनेच्या नात्या चित्रीत केलेले दिसले. तसेच प्रेम कथा ही चित्रे केलेले दिसले. तर अशीच एक गाजलेली पाैराणिक कथा म्हणजे ‘महाभारत’. या मालीकेने आता पर्यत अनेक लोकांच्या मनावर आधीराज्य गाजवले आहे. तर या दूरचित्रवाणीच्या इतिहासातील ‘महाभारत’ एक अविस्मरणीय अध्याय आहे. तर या मालीकेतील आज कलाकार लोकप्रिय आहेत. त्याच्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षक आजही त्यांना विसरले नाहीत. आज या मालिकेत नकुल आणि सहदेव यांच्याबद्दल सांगणार आहोत.
बी.आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ आज हि तितकीच लोकप्रिय आहे. आणि यातील कलाकार आज काय करतात हे प्रेक्षक जाणुन घेण्यासाठी उत्सुक असतात. तर तुम्हाला माहित आहे का की नकुल आणि सहदेव यांची भूमिका साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यात भाऊ होते? नकुलची भूमिका समीर चित्रे (chitre)यांनी साकारली होती, तर त्याचा धाकटा भाऊ संजीव चित्रे याने सहदेवाची भूमिका साकारली होती. त्यामुळे ही केमस्ट्री पडद्यावरही उत्तम दिसली.
युधिष्ठिराची भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी एका मुलाखतीत समीर चित्रे आता आपल्यात नाहीत या दुःखद बातमीला दुजोरा दिला. ‘महाभारत’नंतर समीरने बॉलिवूडच्या काही मोठ्या चित्रपटांमध्ये आपली छाप सोडली. आमिर खान आणि पूजा भट्ट यांच्या सुपरहिट ‘दिल है की मानता नहीं’ मधील पूजाचा होणारा नवरा दीपक कुमार या भूमिकेसाठी तो विशेष ओळखला जातो. संजीव चित्रे यांनी महाभारत नंतर अनेक चित्रपट मालीकामध्ये दिसले, पण आता ते या क्षेत्रापासुन दुर आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










