आदित्य धरच्या ‘धुरंधर’ ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटांमधील कलाकारांना आता चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. या चित्रपटांमधील अभिनयामुळे प्रसिद्धी मिळवलेली सारा अर्जुन सध्या तिच्या इतर प्रोजेक्ट्सच्या तयारीत व्यस्त आहे. तर ‘धुरंधर’ या चित्रपटामुळे साराला अगदी लहान वयात उत्तम प्रसिध्दी मिळाली आहे. तर या दरम्यान तिने ती एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहे. सारा अर्जुनचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. या क्लिपमध्ये, लहान सारा आलिया भट्ट आणि सह-कलाकार रणवीर सिंगची ‘क्वीन’ दीपिका पदुकोण यांना आपली प्रेरणा मानताना दिसत आहे.
सारा अर्जुन दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांनी जरी प्रेरणा मानत असली तरी मात्र, ती हे देखील स्पष्ट केले आहे की तिला कोणाचीही नक्कल करायची नाही किंवा कोणाचीही जागा घ्यायची नाही, तर स्वतःची ओळख निर्माण करणे हे तिचे ध्येय आहे. तिला सारा अर्जुन म्हणून ओळखले जायचे आहे. इतक्या लहान वयात सारा अर्जुनचा आत्मविश्वास पाहून लोक थक्क झाले आहेत.
रणवीर (ranveer)सिंग अभिनीत ‘धुरंधर’ या चित्रपटात साराने उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर याच दरम्यान तिचा अवघी ११ वर्षांची असतानाचा हा व्हिडिओ आहे. जो क्लिपमध्ये, एक चाहता लहान साराला विचारताना दिसतो, “बॉलिवूडमधील कोणती अभिनेत्री तुझा आदर्श आहे?” या वेळी तिच्या आईनेच हा व्हिडिओ तिच्या लहानपणी रेकॉर्ड केला होता. तिने मला आलिया भट्ट खूप आवडते. मी आलियाच्या अभिनयाची खूप मोठी चाहती आहे. खरं तर, मला आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण दोघीही खूप आवडतात असे तिने या व्हिडीओमध्ये बोलताना दिसली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अक्षय कुमार अभिनीत ‘भूत बंगला’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, चित्रपटाची कमाई 200 कोटींच्या उंबरठ्यावर










