अशनूर कौर ही एक टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तिने बालकलाकार म्हणूनही अनेक सिरीयल मध्ये काम केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बिग बॉस 19 मध्ये ती दिसली होती. बिग बॉस 19 मध्ये ती उत्तम खेळली मात्र त्यासोबतच तिला तिच्या परफॉर्मन्स आणि अभिषेक बजाजसोबतच्या मैत्रीसोबतच, ती तिच्या सह-स्पर्धकांनी केलेल्या वजनावरून हिणवण्याच्या कमेंट्समुळेही चर्चेत होती. शो दरम्यान, तान्या मित्तल आणि नीलम गिरी अशनूरला बॉडी-शेमिंग करताना दिसल्या. त्यानंतर होस्ट सलमान खानने तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांना फटकारले होते. ती खुप दिवसापासुन या सम्यसेशी लढत होती. त्या वेळीस या गोष्टीमुळे अशनूर कौर अपराधी वाटायचे. पण आता तीला पाहले तर तुम्ही तीच अशनुरच आहे का असे वाटेल कारण आता तिचा कायापलट झाला आहे.
अशनूर (ashnoor)कौरने नुकतेच सोशल मीडियावर नवीन फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत. या फोटो आणि व्हिडिओमध्ये, अशनूर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रॅम्प वॉक करताना आणि पोज देताना दिसत आहे. या पोस्टसोबतच, अशनूरने खुलासा केला की ती या इव्हेंटची शोस्टॉपर देखील होती. या फोटो आणि व्हिडिओमधील अशनूरचा कायापालट पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. अशनूर कौर ने तिचे वजन खुप घटवले आहे.
अशनूर कौरने नुकतेच एका शो दरम्यान म्हणले की, शोमधून बाहेर आल्यानंतर मी पुन्हा सर्व काही सुरू केले. मी अडीच महिने फक्त लीकवीड आहारावर राहिले आणि दिवसातून दोनदा व्यायाम करते. मी सकाळी उठून व्यायाम करते, तसेच संध्याकाळी अर्धा तास चालते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ मराठी व्हर्जनपेक्षा हिंदीमध्ये लहान असणार; यामागील कारण जाणून घ्या?










