Thursday, September 17, 2026
Home बॉलीवूड प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच अभिनेत्रीने घेतला बॉलिवूडमधून ब्रेक; वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांकडून होतोय प्रेमाचा वर्षाव

प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच अभिनेत्रीने घेतला बॉलिवूडमधून ब्रेक; वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांकडून होतोय प्रेमाचा वर्षाव

अनुष्का शर्मा ही एक लोकप्रिय अभिनत्री आहे. तिने आतापर्यत अनेक उत्तम चित्रपटामध्ये काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच तिने आतापर्यत केलेले अनेक चित्रपट गाजले आणि प्रेक्षक आजही या चित्रपटाना विसरु शकले नाहीत. तर आज अनुष्का शर्मा  वाढदिवस आहे. अनुष्का त्या काही मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे. तर तिच्या वाढदिवसानिमित्ताने तिच्या विषयी जाणुन घेवुयात.

अनुष्काने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2008 साली प्रदर्शित झालेल्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून केली. हा पदार्पणाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि अनुष्का एक आघाडीची अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली. त्यानंतर, अनुष्काने सातत्याने दमदार चित्रपट दिले. ‘बदमाश कंपनी’ आणि ‘बँड बाजा बारात’  त्यानंतर तिने ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’, ‘जब तक है जान’, पीके, एनएच१० आणि दिल धडकने दो यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अनुष्का शर्माचे (sharma)लग्न भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबत झाले आहे. अनुष्का आणि विराटच्या प्रेमप्रकरणाच्या अफवा त्यांच्या लग्नाच्या काही वर्षांपूर्वी सुरू झाल्या होत्या. अनुष्काने तिच्या करिअरच्या शिखरावर असताना 2017 मध्ये विराटशी लग्न केले. लग्नानंतर अनुष्काने तिच्या करिअरचा वेग कमी केला. आता, गेल्या काही वर्षांपासून अनुष्का कॅमेऱ्यासमोर क्वचितच दिसत असते. मात्र अनुष्काच्या चाहत्याचे तिच्या वरील कमी झाले नाही तिच्या आयुष्यात जे काही घडतं ते जाणुन घेण्यासाठी चाहते आतुर असतात. तसेच आज तिच्या वाढदिवसा निमित्ताने चाहत्याने तिला भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

महाभारत मधील घटोत्कच आठवतोय? ज्याच्या एंट्रीने थरथर कापायचे शत्रू, त्याच्या बलाढ्य आकाराने टीव्ही स्क्रीनही पडायची छोटी

हे देखील वाचा