[rank_math_breadcrumb]

क्रिती सेनन रश्मिका मंदानाकडे का आकर्षित झाली? ‘कॉकटेल २’ मध्ये काम करण्याचा अनुभव केला शेअर

अभिनेत्री कृती सेनन सध्या तिच्या आगामी ‘कॉकटेल २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात ती रश्मिका मंदाना आणि शाहिद कपूर यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कृती सॅनॉन आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अनेकदा, जेव्हा दोन आघाडीच्या अभिनेत्री एकाच चित्रपटात एकत्र येतात, तेव्हा चित्रपटाची मोठी चर्चा होते. नुकतेच, कृतीने रश्मिकासोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगितला.

नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात, कृती सेननने ‘कॉकटेल २’ मध्ये रश्मिका मंदानासोबत काम करण्याच्या तिच्या अनुभवाबद्दल सांगितले. ती म्हणाली, “रश्मिका खूप प्रामाणिक, दयाळू, प्रेमळ आणि मनमिळाऊ आहे. तिच्यात अजिबात न्यूनगंड नाही. ती पूर्णपणे चांगुलपणाने भरलेली आहे आणि मला सकारात्मक ऊर्जेकडे आकर्षित झाल्यासारखं वाटतं. जर मला कोणाची ऊर्जा आणि सकारात्मकता जाणवली, तर मी त्यांच्याकडे खेचली जाते. तिच्यासोबत काम करताना मला खूप मजा आली आणि ती अप्रतिम आहे. ती मला खरंच खूप आवडते.”

कृतीने ‘कॉकटेल २’ आणि २०१२ च्या ‘कॉकटेल’ यांच्यातील तुलनेवरही भाष्य केले. अभिनेत्रीने स्पष्ट केले की, ‘कॉकटेल’ हा थेट सिक्वेल नाही. हा एक फ्रँचायझी चित्रपट आहे, ज्याची कथा आणि पात्रे वेगळी आहेत. या तुलनेबद्दल बोलताना कृती म्हणाली, “मला खात्री आहे की तुलना होईल, पण चांगली गोष्ट ही आहे की हा सिक्वेल नाही. ही एक फ्रँचायझी आहे. त्यामुळे, हे एक वेगळे वातावरण आणि वेगळी पात्रे असलेली फ्रँचायझी आहे.”

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कॉकटेल’ या चित्रपटात सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी यांनी भूमिका साकारल्या होत्या. ‘कॉकटेल’ हा चित्रपट त्याच्या संगीत, पात्रे आणि आधुनिक नातेसंबंधांच्या नाट्यामुळे अनेक वर्षांपासून एक कल्ट चित्रपट बनला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला.

होमी अदजानिया दिग्दर्शित ‘कॉकटेल २’ हा चित्रपट १९ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणातील अनेक फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन समोर आले असून, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

अनेकांच्या मते, हा चित्रपट शाहिद कपूर, कृती सॅनॉन आणि रश्मिका मंदाना यांच्यातील प्रेम त्रिकोणावर आधारित असेल. दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी या अफवांवर विनोदी पद्धतीने प्रतिक्रियाही दिली आहे. चित्रपटातील ‘जब तलक’ हे गाणेही खूप लोकप्रिय होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

आमिर खानने कपिल शर्मासोबत ‘आती क्या खंडाला’वर केला डान्स , ‘दादी की शादी’च्या स्क्रिनिंगचे व्हिडिओ व्हायरल