Monday, May 11, 2026
Home बॉलीवूड थरार, गुन्हेगारी आणि अ‍ॅक्शनने भरलेलं एंटरटेनमेंट; या आठवड्यात Ott वर येणार भन्नाट सिरीज आणि चित्रपट

थरार, गुन्हेगारी आणि अ‍ॅक्शनने भरलेलं एंटरटेनमेंट; या आठवड्यात Ott वर येणार भन्नाट सिरीज आणि चित्रपट

आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. तर आता या वीक मध्ये ott वर मनोरंजनाचा भरघोस कंटेंट उपलब्ध असणार आहे. जर तुम्ही या वीकेंडला काहीतरी उत्तम पाहण्याचा विचार करत असाल, तर प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार आणि झी 5 वर प्रदर्शित होणाऱ्या प्रमुख चित्रपट आणि मालिकांच्या यादीवर एक नजर टाका

धुरंधर: द रिव्हेंज –  या चित्रपट सर्वच स्तरावर उत्तम ठरला आणि आता तो ओटिटि वर रीलीज होण्यास आता सज्ज आहे. आदित्य धर (dhar)दिग्दर्शित – या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अली खान, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. तर हा चित्रपट 15 मे पासून जिओ हॉटस्टारवर पाहू शकतात.

कर्तव्य – गुन्हेगारी आणि न्यायाची गुंतागुंत उलगडणारा ‘कर्तव्य’ हा चित्रपट या आठवड्यातील आणखी एक प्रमुख आकर्षण आहे. पुलकित दिग्दर्शित या क्राईम ड्रामाची निर्मिती शाहरुख खानची पत्नी गौरी खानने रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली केली आहे. हा चित्रपट 15 मे पासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होईल.

एक्झाम – “एक्झाम” ही एक तमिळ ड्रामा मालिका आहे. जी 15 मे रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. आणि ही मालिका अशा विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची कथा सांगते, जे यशाच्या शोधात आपल्या भावना आणि नातेसंबंध पणाला लावतात.

इन्स्पेक्टर अविनाश सीझन 2 – हि एक सीरीज आहे. रणदीप हुडा शूर यूपी पोलीस अधिकारी अविनाश मिश्राच्या भूमिकेत परत येत आहे. उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित ही थ्रिलर मालिका १५ मे पासून जिओ हॉटस्टारवर उपलब्ध होईल.

द क्रॅश- “द क्रॅश” ही मालिका खऱ्या घटनांवर आधारित असुन हि कथा प्रतेकांनी पाहावी अशी आहे. हा क्राईम डॉक्युमेंटरी २०२२ मधील एका भीषण घटनेवर आधारित आहे. तर हा डॉक्युमेंटरी मालिका 15 मे पासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल.

मार्टी, लाईफ इज शॉर्ट – मार्टिन शॉर्ट यांच्या जीवनावर मार्टी, लाईफ इज शॉर्ट  ही डॉक्युमेंटरी आहे. तर मार्टिन शॉर्ट  हे एक प्रसिद्ध कॅनेडियन विनोदी कलाकार आणि लेखक होते. हि प्रेरणादायी डॉक्युमेंटरी 12 मे पासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल.

बर्लिन अँड द लेडी विथ ॲन एर्माइन – हि एक उत्तम मालिक असुन  ही मालिका 15 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

तेलगू अभिनेते के. भरत कांत आणि सिनेमॅटोग्राफर जी. साई त्रिलोक यांचा एका भीषण कार अपघातात मृत्यू

हे देखील वाचा