Friday, May 15, 2026
Home बॉलीवूड ‘धुरंधर: द रिव्हेंज’च्या OTT रिलीजची घोषणा, जाणुन घ्या स्ट्रीमिंगची तारीख आणि प्लॅटफॉर्म

‘धुरंधर: द रिव्हेंज’च्या OTT रिलीजची घोषणा, जाणुन घ्या स्ट्रीमिंगची तारीख आणि प्लॅटफॉर्म

आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. अश्यातच आता एक या वर्षी सर्वात लोकप्रिय ठरलेला चित्रपट म्हणजे धुरंधर: द रिव्हेंज तर या आता हा चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित झाला आहे.

‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.  ‘धुरंधर: द रिव्हेंज’ने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत धुमाकुळ घातला. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1300 कोटींहून अधिक आणि जगभरात 1800 कोटींची कमाई केली. हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला असताना, चाहते त्याच्या ओटीटी प्रदर्शनाची आतुरतेने वाट होते. तर आता हा चित्रपट जागतिक स्तरावर नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल, तर भारतात तो जिओ हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

रणवीर सिंग अभिनीत ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली पण आता ओटीटीवर किती कमाई करेण हे पाहण्यासारखे आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर (dhar)यांनी केले आहे. वृत्तानुसार, ओटीटी आवृत्तीचा कालावधी अंदाजे 3 तास ​​52 मिनिटे आहे, जो थिएटरमधील आवृत्तीपेक्षा थोडा जास्त आहे. थिएटरमधील चित्रपटाचा कालावधी 3 तास ​​49 मिनिटे होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

या दमदार सिरीज समोर ‘पाताल लोक’चं अ‍ॅक्शनही पडेल फिकं, 3 हिट सीझननंतर चौथ्या भाग येणार भेटीला

हे देखील वाचा