टीव्ही मालिका हे अनेक लोकांच्या दैनदिंन जीवनामधील मनोरंजाचा भाग आहे. लहाग्यांसाठी आणि वृध्दासाठी मालिका हे उत्तम मनोरंजाचे साधन आहे. आणि काही वर्षाखालील एक मालिका होती जिने प्रत्येक लहान मुलाची मने जिंकुण घेतले. 2000 साली प्रदर्शित झालेली, ही प्रत्येक लहान मुलाची आवडती टीव्ही मालिका म्हणजे ‘सोनपरी’. हि 26 मालिका वर्षांपूर्वी अंत्यत लोकप्रिय होती.
सोनपरी (sonpari)हि मालिका लोकप्रिय झाली कारण या मालिकेची उत्तम कथा आणि त्यातील कलाकाराचा उत्तम अभिनय तर यातील आल्टू अंकल म्हणजेच अशोक लोखंडे यांच्यापासून ते सोनपरीच्या भूमिकेतील मृणाल कुलकर्णीपर्यंत, प्रत्येक कलाकार मुलांचा आवडता राहिला आहे. पण एक असे पात्र आहे जे आजही तिच्या निरागसपणा आणि भोळेपणासाठी लक्षात राहते. आम्ही बोलत आहोत ‘सोनपरी’मधील फ्रुटीबद्दल.
‘सोनपरी’मधील फ्रुटी ही एक निरागस, गोड, खेळकर आणि निर्भीड लहान मुलगी होती, जिची भूमिका तन्वी हेगडेने साकारली होती. फ्रुटी एक धाडसी मुलगी होती, जी प्रत्येक आव्हानाला सामोरे जात असे. तर हि तन्वी हेगडे आता २६ वर्षांची आहे. तिने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा जुना आणि नवीन लूक दिसत आहे. गेल्या काही वर्षांत तन्वी हेगडेचा लूक खूप बदलला आहे, पण तिचा निरागसपणा आणि भोळेपणा तसाच राहिला आहे. ‘सोनपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘फ्रुटी’ तन्वी हेगडेची एक रील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तसेच तीने या मालिकेनंतर अनेक मालिका चित्रपटात दिसली आहे. मात्र या ‘सोनपरी’ मालिकेतील भुमिकेमुळे ती प्रंचड गाजली. तर तिने अभिनय सोडून दिला आणि आज ती गेमिंगच्या जगात आपली छाप सोडत आहे. अभिनेत्री ते गेमर बनलेली तन्वी हेगडे आज अभिनयापासून दूर असते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
300 हून अधिक चित्रपटांत काम केलं, पण ‘रामायण’मध्ये काम करुन जिंकली प्रेक्षकांची मने










