खुशी कपूर हि एक बॉलीवूड अभिनेत्री आहे. काही वर्षापूर्वी तिने चित्रपटसृष्टीमध्ये पर्दापण केले आहे खुशीने २०२३ मध्ये ‘द आर्चीज’मधून या क्षेत्राकडे ती वळाली आणि त्यानंतर त्याच दरम्यान सहकलाकार अभिनेता वेदांग रैना आणि तिच्या नात्याबाबत अफवा पसरल्या होत्या कारण ते अनेकदा एकत्र दिसून आले तसेच दोन वर्षापासून त्यांच्या बाबत चर्चा सुरू आहे. मात्र आता काही दिवसापासून त्यांच्या ब्रेकरच्या अथवा पसरत आहेत. आतापर्यंत खुशी कपूर आणि वेदांग रैना यांनी या अफवांवर मौन बाळगले होते, पण आता वेदांग रैनाने त्यांच्या ब्रेकअपला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे.
वेदांग रैना आता त्याच्या एका आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. आणि त्या चित्रपटाचे नाव आहे ‘मैं वापस आऊंगा’ , या चित्रपटात शर्वरी वाघ सुध्दा काम करत आहे. तर हा वेदांग रैना सध्या त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर याच दरम्यान मिडीयाशी बोलताना वेदांग रैना याने सांगितले की, मी कोणत्याही जोडप्याशी स्वतःला जोडू शकत नाही कारण मी नात्यात नाही.” वेदांग रैनाकडून हे ऐकल्यानंतर, त्याचे बहुतेक चाहते विचारत आहेत, “त्याचे आणि खुशीचे ब्रेकअप झाले आहे का?”
वेदांग रैना आणि खुशी (Khushi)कपूर या दोघानी 2023 मध्ये एकत्र काम केले होते. त्या दरम्यान त्याची चांगली मैत्री झाली आणि ते नंतर अनेक कार्यक्रमात एकत्र दिसुन आले आणि त्यामुळे त्याच्या नात्याबाबत चर्चा सुरु झाल्या. त्यानी कधीही त्याच्या नात्याबाबत स्पष्टता दिली नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘सत्यानाश करून टाकलं’; अनन्या पांडेच्या भरतनाट्यम परफॉर्मन्सवर नेटकऱ्यांची प्रंचड टीका










