सोनाली कुलकर्णी हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तसेच तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच ती सोशल मिडीयावर हि सक्रिय असते. आणि आता एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे सध्या तिच्या ‘हाफ तिकीट फुल नागरिक’ या पॉडकास्टमुळे चर्चेत आली होती. त्या मध्ये या अभिनेत्रीने भारतीय महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले आहे. 2023 मध्ये सोनाली कुलकर्णी त्यामुळे प्रंचड चर्चे झाली. त्यावेळी एक संभाषना दरम्यान तिने महिलांना ‘आळशी’ म्हटले होते.
तर या चर्चेमुळे अभिनेत्रीने म्हटले होते की महिला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रियकरावर किंवा पतीवर अवलंबून असतात. या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आणि सोनालीला तीव्र प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले. “मी समाजात पुरुषांचा आदर करण्याच्या बाजूने आहे. आपल्यापैकी बहुतेक जण असा विचारच करत नाहीत की पुरुषसुद्धा भावनिक आणि नाजूक क्षणांमधून जाऊ शकतात. प्रत्येक पुरुष जन्मतः खलनायक नसतो. तेसुद्धा माणूसच असतात. जसे आपण लहान मुलींचे संरक्षण करतो, तसेच आपण लहान मुलांचेही संरक्षण केले पाहिजे.
2023 मध्ये सोनाली (sonali)कुलकर्णीने काही महिलांमध्ये वाढणाऱ्या परावलंबित्वावर चिंता व्यक्त केली होती, ती म्हणाली होती, “भारतातील अनेक मुली आळशी आहेत. त्यांना बॉयफ्रेंड, चांगली नोकरी असलेला नवरा आणि घर हवं असतं.” आणि ती पुढे म्हणाली की हे कुठ तरी बदलायला हवं.
‘भूल भुलैया’ मधील छोट्या पंडिताचा लूक कसा तयार झाला? राजपाल यादवने सांगितला मजेशीर किस्सा


