Monday, June 8, 2026
Home साऊथ सिनेमा बॉक्स ऑफिसवर ‘पेड्डी’चा धुमाकुळ; अवघ्या चार दिवसांत 150 कोटींचा टप्पा पार

बॉक्स ऑफिसवर ‘पेड्डी’चा धुमाकुळ; अवघ्या चार दिवसांत 150 कोटींचा टप्पा पार

राम चरण हा एक दाक्षिनात्य लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आता पर्यत अनेक चित्रपट केली तसेच तो आता त्याच्या पेड्डी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर हा चित्रपट नुकताच प्रर्दिशित झाला आहे. आणि हा चित्रपट बाॅक्स ऑफिस चांगली  कमाई करत आहे. हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा आहे तर या मध्ये जान्हवी कपूर आणि राम चरण हे मुख्य भुमिकेत आहेत. तर आता हा चित्रपट जरी गाजत असला तरी ही प्रेक्षकांनी चित्रपटातील जान्हवी कपूरच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

पेड्डी‘ (peddi)हा चित्रपट बुची बाबू सना दिग्दर्शित आहे. आणि या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे. शनिवारी चित्रपटाने 31.88 कोटींची कमाई केली होती. त्या तुलनेत ही आता जास्त वाढ झाली आहे. जेव्हा त्याने 51 कोटींची कमाई केली होती. ‘पेड्डी’ने पहिल्याच दिवशी ॲडव्हान्स बुकिंगमधून 20 कोटींची कमाई केली. हा चित्रपट गुरुवारी 3000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. यामुळे चित्रपटाची भारतातील एकूण कमाई 187.02 कोटी आणि जगभरातील कमाई ₹233.02 कोटींवर पोहोचली आहे.

‘पेड्डी’ या चित्रपटात महिलांचे चित्रण आणि नायिकेच्या अति लैंगिक दृश्यांमुळे जोरदार टीका झाली आहे. तर आता याबाबत अभिनेत्री डिंपल हयातीने जान्हवीच्या समर्थनार्थ एक निवेदन जारी केले आहे. तसेच बुची बाबू सना यांनीही एक निवेदन जारी केले आहे. जरी यातील काही सीम टिका असली तरीही हा चित्रपट बाॅक्स ऑफिस धुमाकुळ घालत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

‘राख’ पासून ‘करुप्पू’ पर्यंत, हे चित्रपट आणि मालिका ओटीटीवर होणार प्रदर्शित

हे देखील वाचा