Tuesday, June 16, 2026
Home साऊथ सिनेमा प्रेक्षकांना भुरळ घालणारी ‘29’, नेटफ्लिक्सवर 11 दिवसांपासून कायम आहे ट्रेंडिंगवर

प्रेक्षकांना भुरळ घालणारी ‘29’, नेटफ्लिक्सवर 11 दिवसांपासून कायम आहे ट्रेंडिंगवर

अलीकडच्या काळामध्ये मोठ्या बजेटचे चित्रपट निघत आहेत तसेच मोठा बजेट म्हणजे त्यातील सेट किंवा साहित्य अशा अनेक गोष्टी त्यामध्ये आल्या आणि त्याचे प्रदर्शन सोशल मीडियावर होत असते. मात्र नेहमीच हे सिद्ध झाले आहे की बजेट मुळे कधीच चित्रपट उत्तम ठरत नाहीत तर त्यातील अभिनय आणि कथा यामुळे चित्रपटाच्या यशाची पायरी ठरत असते. तर अशाच एका स्वरूपाचा चित्रपट सध्या प्रदर्शित झाला आहे त्यामध्ये नावाजलेले कलाकार नाहित तसे पण त्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि कथामुळे प्रेक्षकांना भाऊक केले आहे.

हा चित्रपट म्हणजे 29 असे नाव असलेला आहे पण याच दरम्यान माधुरी (madhuri)दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्या सारख्या नावाजलेल्या कलाकारांच्या चित्रपटांनाहि ओटीटीवर 29 या चित्रपटाने मागे टाकले आहे. माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्या चित्रपटाची  कथा इतकी भावूक आहे की ती कोणाच्याही डोळ्यात पाणी आणू शकते. जर तुम्हाला रोमँटिक चित्रपट आवडत असतील, तर हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. दहा दिवसांहून अधिक काळ उलटूनही, हा चित्रपट मोठ्या संख्येने पाहिला जात आहे.

या चित्रपटाच्या कथेबाबत सांगायचे तर हा रोमँटिक चित्रपट ‘सत्य’ नावाच्या 29 वर्षीय अविवाहित तरुणाभोवती फिरतो. आयुष्यात कोणतेही स्पष्ट ध्येय नसल्यामुळे त्याला अनेकदा इतरांच्या टोमण्यांचा सामना करावा लागतो. हा चित्रपट मुळत: तमिळ भाषेत रिलीज झाला होता माक्ष आता तो हिंदी, कन्नड, मल्याळम आणि तेलगू भाषांमध्येही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तर या चित्रपटाला  IMDb वर 10 पैकी 7 रे.4टिंग मिळाले आहे.

हेही वाचा

370 रुपयांच्या बिर्याणीच्या वादावर मुन्नावर फारुकीने केले प्रणित मोरेचे समर्थन

हे देखील वाचा