[rank_math_breadcrumb]

पहिला भाग सुपरहिट, दुसऱ्याने रचला इतिहास; आता ‘गदर 3’ साठी दिग्दर्शक अनिल शर्मा सज्ज

‘गदर: एक प्रेम कथा’  हा एक बॉलीवूड मधील ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या चित्रपटाचे चाहते आणि काही लोकप्रियता आजही तितकेच आहे. या चित्रपटाचा सिक्वेल सुद्धा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. आणि आता गदर एक प्रेम कथा या चित्रपटाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहे त्यानिमित्ताने चित्रपटाच्या टीमने सोमवारी एका विशेष कार्यक्रमात या चित्रपटाचा 25 वा वर्धापन दिन साजरा केला. या कार्यक्रमात अभिनेते सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल आणि संपुर्ण टिमचे साहय्यक उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या वेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा (sharma)हि उपस्थित होते आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तर या क्षणी ते म्हणाले की या आता या भाग हा जबरदस्त असेल. असे म्हणत ते पुढे म्हणाले की “पहिला भाग हा एक ‘बॉम्ब’ होता, दुसरा भाग ‘अणू बॉम्ब’ होता आणि तिसरा भाग ‘न्यूक्लियर बॉम्ब’ असेल.

‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाची कथा बुटा सिंग यांच्या खऱ्या आयुष्यातील कथेवर आधारित असलेला ‘गदर’ हा चित्रपट 1947 च्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. तर त्या वेळी बॉक्स ऑफिसवर आमिर खानच्या ‘लगान’शी थेट स्पर्धा होऊनही, या चित्रपटाने लाखो लोकांची मने जिंकली आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक म्हणून स्थान मिळवले. आणि या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले आहे. आज ही प्रेक्षक हा चित्रपट याची कथा आणि कलाकाच्या अभिनयाला विसरु शकला नाही.

हेही वाचा

370 रुपयांच्या बिर्याणीच्या वादावर मुन्नावर फारुकीने केले प्रणित मोरेचे समर्थन