Tuesday, June 23, 2026
Home अन्य ‘ग्राम चिकित्सालय 2’ ते ‘लॉक अप 2’; OTT वर या आठवड्यात नव्या रिलीजची धूम

‘ग्राम चिकित्सालय 2’ ते ‘लॉक अप 2’; OTT वर या आठवड्यात नव्या रिलीजची धूम

आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. अश्याच काही  सिरीज म्हणजे मिर्झापूर,पंचायत या सिरीज ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तर अश्याच काही सीरीज आता या मध्ये रीलीज होत आहेत. तर या काेणत्या त्या पाहुयात.

एचबीओ मॅक्स – ची लोकप्रिय मालिका ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’चा तिसरा सीझन या आठवड्यात, २२ जून २०२६ रोजी जिओ-हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेमध्ये एम्मा डी’आर्सी, मॅट स्मिथ आणि ऑलिव्हिया कुक यांच्या भुमिका आहेत.

‘ग्राम चिकित्सालय’- चा दुसरा सीझन या मंगळवारी, 23 जून 2026 रोजी प्राइम व्हिडिओवर परत येत आहे. अमोल पराशर, आकाश मखीजा, आनंदेश्वर द्विवेदी, विनय पाठक, आकांक्षा रंजन कपूर, गरिमा विक्रांत सिंग आणि इतर कलाकारांची भूमिका  या मध्ये आहे तर हि मालिका डॉ. प्रभात यांची कथा सांगते. ते एका गावात येउन त्याचे दवाखाण्याचे काम सुरु करतात.

‘लॉक अप’ – फराह खान आणि रितेश देशमुख यांच्या सूत्रसंचालनाखालील ‘लॉक अप’  या रिअ‍ॅलिटी शोचा दुसरा सीझन 27 जून 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. एकता कपूर यांच्या या शोचा पहिला सीझन 2022 मध्ये ‘ऑल्टबालाजी’वर प्रदर्शित झाला होता.

अलायन्स (Alliance) -कुणाल खेमू यांच्या सूत्रसंचालनाखालील ‘अलायन्स’ हा शो 26 जून 2026 रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. ही या प्लॅटफॉर्मची पहिली जागतिक स्तरावरील ‘डेली सिरीज’  असेल, जिचे नवीन भाग दररोज दुपारी 12 वाजता प्रदर्शित केले जातील.

राजा शिवाजी – या चरित्रात्मक ऐतिहासिक ॲक्शन-ड्रामा चित्रपटात रितेश देशमुख यांनी मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. नेटफ्लिक्सवर हा 26 जून 2026 प्रसारीत होईल

‘ॲश पीपल’ , लिंगम हे दोन मालीक सुध्दा या वीक मध्ये ओटिटिवर रिलीज होणार आहेत. या आठवड्यात तुम्ही या चित्रपट आणि मालिकाचा आंनद घरबसल्या घेवु शकता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

रणबीर कपूर बनला आदर्श नवरा, आलिया भट्टच्या ‘अल्फा’ला अनोख्या पद्धतीने दिला पाठिंबा

हे देखील वाचा