[rank_math_breadcrumb]

अभिनेत्री तृषा क्रिष्णनची विजयसाठी खास बर्थडे पोस्ट…!

विजय हा एक दाक्षिणात्या लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आता पर्यत अनेक उत्तम चित्रपटे केली आणि त्याच्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तसेच विजय आता राजकारात सुध्दा उतरला आहे. तर नुकताच विजयचा वाढदिवस झाला. तर विजयचा वाढदिवस चाहते नेहमीच एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करतात. तसेच अनेक चाहत्यांनी विजयला सोशल मिडीया शुभेच्छा दिल्या. मात्र सगळ्याचे लक्ष वेधुन घेतले ते एका पोस्टने ते म्हणजे विजयची जवळची मैत्रीण आणि त्याची सर्वात लोकप्रिय ऑन-स्क्रीन सह-कलाकार असलेल्या त्रिशा कृष्णनने दिवसभर त्याच्याबद्दल एकही पोस्ट शेअर केली नव्हती. यामुळे सोशल मीडियावर तर्कविजयराम दिला आहे, मात्र तिने जो फोटो पोस्ट केला आहे त्या फोटो मधील एकमेकांना पाहण्याची जी नजर आहे. ती काय चाहत्याच्या नजरेतुन चुकु शकली नाही.

त्रिशा कृष्णनने जो फोटो पोस्ट केला आहे त्यात असे दिसत आहे की त्रिशा विजय (vijay)हे दोघे त्या फोटो मध्ये आहेत विजय केक कापत आहे आणि त्रिशा विजय कडे पाहत आहे. आणि तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे. “अशा व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, जी प्रत्येक गोष्ट खूप खास आणि अर्थपूर्ण बनवते.” असे तिने म्हणले आहे. तिने ही पोस्ट करताच लगेच सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

या दोघांनी एकमेकांना अनफाॅलो केलेचे दिसत होते मात्र या पोस्ट नंतर आता तर दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याचे पाहून त्यांना दिलासाही मिळाला. सोशल मीडियावर तासनतास चाललेल्या चर्चांच्या दरम्यान, या पोस्टने चाहत्यांना आनंदाची एक उत्तम संधी दिली.

 

हेही वाचा

4 दिवसात कॉकटेल 2चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, 85 कोटी रुपयांचा गाठला टप्पा