Monday, June 29, 2026
Home बॉलीवूड ‘वेलकम टू द जंगल’चा बॅाक्स ऑफिसवर धुमाकूळ, चित्रपटाने 3 दिवसांत जगभरात 93 कोटींची केली कमाई

‘वेलकम टू द जंगल’चा बॅाक्स ऑफिसवर धुमाकूळ, चित्रपटाने 3 दिवसांत जगभरात 93 कोटींची केली कमाई

अक्षय कुमार हा बॉलीवूड मधील एक लोकप्रिय कलाकार आहे. कारण त्याचे आतापर्यंतचे चित्रपट हे नेहमीच ब्लॉकबस्टर राहिले आहेत आणि तो त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांना हसण्याचे काम करत असतो. जसे की हेराफेरी, गरम मसाला, वेलकम, भूत बंगला, या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांना प्रचंड हसवले आहे. आणि सध्या त्याचा रिलीज झालेला चित्रपट म्हणजे वेलकम टू द जंगल हा चित्रपट आता बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे, तसेच या चित्रपटाची टीम सुद्धा खूप मोठी आहे. तरी या चित्रपटात एकूण 32 दिग्गज कलाकारांनी काम केले आहे.

‘वेलकम टू द जंगल’ प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहे. या तीन दिवसांतच त्याने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 60 कोटींचा हा उत्तम आकडा पार केला आहे. पेड प्रिव्ह्यूसह, या मल्टी-स्टारर चित्रपटाने आतापर्यंत 63 कोटी रुपये  कमावले आहेत. पेड प्रिव्ह्यूच्या दिवशी 26% प्रेक्षकसंख्येसह 3.75 कोटी रुपये कमावले. पहिल्या दिवशी 26 टक्के प्रेक्षकसंख्येसह 15.25 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 20 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी, रविवारी, 41 टक्के प्रेक्षकसंख्येसह 24.75 कोटी रुपये कमावले आहेत. तर आतपर्यत एकुण जगभरातील कमाई ही 93 टक्के केली आहे.

‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचे दिग्दर्शिन अहमद खान केले आहे. तर या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांना काम केले आहे. अक्षय (akshay)कुमार, रविना टंडन, अर्शद वारसी, तुषार कपूर, दिशा पटानी, सुनील शेट्टी, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस, राजपाल यादव, जॅकी श्रॉफ, श्रेयस तळपदे, परेश रावल, जॉनी लिव्हर, फरिदा जलाल, दलेर मेहंदी, किकू शारदा आणि आफताब शिवदासानी या कलाकारांना काम केले आहे.

हेही वाचा

‘इक्का’च्या प्रदर्शनापूर्वी, दिग्दर्शक सिद्धार्थने ‘रहमान डकैत’ची प्रशंसा करत म्हटले होते की; ‘तो सर्वोत्कृष्ट आहे…’

हे देखील वाचा