रणबीर कपूर आणि साई पल्लवी अभिनीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. तर हा चित्रपट आता एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या सेटवर नुकत्याच झालेल्या ‘क्रिएटर्स डे’ कार्यक्रमात, सिनेमॅटिक व्हिडिओ निर्माता ध्रुव परीक्षितसह अनेक कंटेंट क्रिएटर्सना आमंत्रित करण्यात आले होते. सेटला भेट दिल्यानंतर, ध्रुवने सोशल मीडियावर एक दावा केला आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याचा दावा असा आहे कि, चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर चर्चा आणि टीका निर्माण करण्यासाठी, मुद्दाम रणबीर कपूरच्या ‘राम’च्या प्रतिमेची एक कमकुवत आवृत्ती प्रदर्शित केली, जेणेकरून चित्रपटाला मोफत प्रसिद्धी आणि मार्केटिंग मिळेल.
ध्रुव याची पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. सुरुवातीला त्याच्या इंस्टाग्रामवर या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. आणि या पोस्ट वर जेव्हा एका युझरने कमेंट्समध्ये त्याला ‘रामायण’च्या अपूर्ण व्हीएफएक्सबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा ध्रुवने चित्रपटाच्या भव्यतेची प्रशंसा केली. त्याने लिहिले की, त्याने तिथे पाहिलेली दृश्ये हॉलिवूड चित्रपट ‘अवतार’च्या तोडीची होती. त्याने हेही उघड केले की तो सेटवर एका व्हीएफएक्स कलाकाराला भेटला होता. कलाकाराने त्याला सांगितले की, निर्मात्यांनी अधिक चांगले व्हिज्युअल्स तयार केले असूनही, त्यांनी मुद्दाम एक अपूर्ण व्हिडिओ ऑनलाइन अपलोड केला, कारण सोशल मीडियावरील टीका मधुन चित्रपटाचे मोफत मार्केटिंग होईल.
मात्र, ध्रुवने आपली कमेंट डिलीट केली. आणि त्याने पुढे स्पष्टीकरण करत म्हणले आहे की, व्हीएफएक्सवर उत्कृष्ट काम सुरू आहे. त्याने स्पष्ट केले की त्याला सेटवर काही अपूर्ण फुटेज दाखवण्यात आले होते, परंतु त्याचा विश्वास आहे की खरे काम महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले होते. पण आधी केलीली कंमेट ही अनेक लोकापर्यत पोहचली आहे. ध्रुवने त्याचे सुरुवातीचे विधान डिलीट केले असले तरी, त्याच्या पूर्वीच्या कमेंटचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाले होते.
रणबीर कपूरचा हा रामायण (ramayan)चित्रपट पाहण्यासाठी अनेक चाहते आतुर आहेत. आणि हा चित्रपट 2026 मध्ये दिवाळीच्या दरम्यान प्रदर्शित होणार आहे. आणि या चित्रपटात रणबीर कपूरसोबत यश, साई पल्लवी, रवी दुबे आणि सनी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
पहिलं घर घेण्याचं स्वप्न फराह खान, शाहरुख खानमुळे झालं होत पूर्ण









