‘ऑब्सेशन’ हा एक उत्तम चित्रपट आहे. आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवल्यानंतर आता ओटीटीवर पदार्पण केले आहे. कारी बार्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिन केले आहे. तसेच हा एक भयपट आहे. ज्या प्रेक्षकांनी आतापर्यत हा चित्रपट पाहिले नाहीत त्यांना आता चित्रपट ओटिटिव्दारे घरबसल्या पाहता येणार आहे. आणि विशेष म्हणजे हा चित्रपट ठरलेल्या मुळ तारखेच्या एक दिवस आधी रीलीज झाला आहे.
‘ऑब्सेशन’ हा चित्रपट 30 जून 2026 रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या भारतीय प्रेक्षकांसाठी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर ‘प्रीमियम व्हिडिओ ऑन डिमांड’ मॉडेल अंतर्गत उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की, हा चित्रपट तुमच्या नियमित प्राइम सबस्क्रिप्शनसोबत विनामूल्य उपलब्ध होणार नाही, त्याऐवजी, तुम्हाला तो डिजिटल स्वरूपात सबस्क्रीप्शन याव्यतिरिक्त, प्रेक्षक ॲपल टीव्ही आणि इतर प्रमुख डिजिटल स्टोअर्सवर ‘भाड्याने घ्या किंवा खरेदी करा’ मॉडेलद्वारे देखील हा चित्रपट पाहू शकतात. सध्या, तो कोणत्याही प्लॅटफॉर्मवरील नियमित स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनचा भाग नाही.
ज्यांना भयपट आवडतात त्यांच्यासाठी हा एक चित्रपट पैसा वसुल चित्रपट असेल. आणि ज्यांना थिएटरमध्ये आधीच पाहिला आहे, त्यांच्याकडे तो पुन्हा पाहण्यासाठी एक उत्तम कारण आहे. ओटीटीवर प्रदर्शित झालेली ही आवृत्ती पूर्णपणे अनरेटेड, अनसेन्सर्ड आहे. वृत्तानुसार, डिजिटल आवृत्तीमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर काढून टाकलेली दृश्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आली आहेत. या विस्तारित आवृत्तीमध्ये अतिरिक्त फुटेजचा समावेश आहे, ज्यामुळे हॉरर चित्रपटांच्या चाहत्यांना एक पूर्णपणे वेगळा आणि परिपूर्ण अनुभव मिळेल.
‘ऑब्सेशन‘(Obsession) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तर उत्तम कमाई करणारा चित्रपट ठरला मात्र ओटिटिवर हा चित्रपट आता हा कसा उतरतो हे पाहण्यासारखे राहिल.
हेही वाचा
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘खाशाबा’ चा दमदार टीझर आऊट, या दिवशी जगभरात चित्रपट होणार प्रदर्शित










