Monday, July 6, 2026
Home बॉलीवूड ‘अल्फा’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, आलिया भट्टच्या चित्रपटाने कमावले 3 दिवसांत इतके कोटी

‘अल्फा’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, आलिया भट्टच्या चित्रपटाने कमावले 3 दिवसांत इतके कोटी

आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ अभिनीत ‘अल्फा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तसेच यात बॉबी देओल आणि अनिल कपूर यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर प्रेक्षाकांकडुन या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तरी ही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. यश राज बॅनरखाली ह्याची निर्मिती झाली आहे. 3 जुलै 2026 रोजी हा चित्रपट रीलीज झाला आहे. 

अल्फा‘ (alfha)चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 34 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या सुरुवातीला या चित्रपटाने बरी कमाई केली मात्र आता वीकंएडमुळे याने उत्तम कमाई केली आहे. 9.25 कोटी रुपयांची कमाई करून सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी 11.50 कोटी रुपये जमवले, रविवारच्या सुट्टीमुळे ‘अल्फा’ला मोठा फायदा झाला. सॅकएनआयएलसीनुसार, चित्रपटाने रविवारी 13.25 कोटी रुपये कमावले आहेत. तर अंदाजे चित्रपटाने जगभरात आतापर्यत 37.90 चा आकडा गाढला आहे.

वृत्तानुसार निर्मात्यांनी या चित्रपटावर खूप पैसा खर्च केला आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘अल्फा’चे बजेट 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. हा एक ॲक्शन चित्रपट असल्याने प्रेक्षकांना ॲक्शनचा पुरेपूर डोस मिळत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी गुप्तहेरांची भूमिका साकारत आहेत.

‘अल्फाची दमदार कमाई सुरु असतानाच आता अलिया भट्टला सोशल मीडियावरील ट्रोलर्सकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे. मात्र अभिनेत्रीची आई, सोनिया राझदान हिने अल्फाला पांठिबा देत आणि आलियाच्या समर्थनासाठी पुढे येत सोनिया राझदान यांनी एक्स वर ‘अल्फा’बद्दलच्या अनेक सकारात्मक पोस्ट्स पुन्हा पोस्ट केल्या आहेत. आणि म्हणले आहे की तितकाही हा चित्रपट वाईट नाही.

हेही वाचा

आमिर खान आणि गौरी स्प्रॅटचा विवाह संपन्न, डान्स करत साजरा झाला हा खास क्षण

हे देखील वाचा