अर्जुन कपूरची बहीण जी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. आणि तिचे नुकतेच विवाह संपन्न झाला आहे. अंशुला कपूरने रोहन ठक्करसोबत लग्नगाठ बांधली आहे. रोहन हा एक लेखक आहे. आणि यांचा हा सोहळा काल मुंबईतील ताज लँड्समध्ये पार पडला आहे. आणि आता या सोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या जोडप्याने सोमवारी रात्री त्यांच्या लग्नाचे अधिकृत फोटो शेअर केले, ज्यामुळे चाहत्यांना जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत झालेल्या या खाजगी सोहळ्याची झलक मिळाली. अंशुला आणि रोहन ठक्कर यांनी पारंपरिक हिंदू रितीरिवाजानुसार विवाह केली आहे. ज्यामुळे आता त्यांच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे.
अंशुला कपूरने तिच्या सोशल मिडियावर हे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये तीने एका सुंदर गुलाबी लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. तर रोहन शेरवानीमध्ये दिसला. असे म्हटले जाते की, लग्नापूर्वी अर्जुन कपूरने मीडिया आणि पापाराझींना विवाहस्थळाबाहेर गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. कारण त्याने म्हणले होते की, हा एक कौटुंबिक सोहळा आहे. आणि हा थोडा गोपनीय असला पाहिजे अशी त्याने मागणी केली होती. मात्र अशी पण चर्चा आहे की, या इंडस्ट्रीतील लोकांसाठी रिसेप्शनचे ओयोजन केले जाणार आहे.
अंशुलाने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आणि रोहनसाठी एक भावनिक संदेश लिहिला. आपल्या पोस्टमध्ये अंशुलाने लिहिले आहे, 06.07.2026 इतक्या लोकांमध्ये, इतक्या ठिकाणी, इतक्या वेळा… ती तू होतीस. आणि कसं तरी, प्रत्येक चढ-उतार, प्रत्येक वळण आणि प्रत्येक आश्चर्यातून, ती अजूनही तूच आहेस. माझं आवडतं संभाषण. माझी सर्वात सुरक्षित जागा. माझी सर्वात सोपी निवड. नेहमीच तू.”
अंशुलाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, खुशी (Khushi)आणि जान्हवी बहिणी-बहिणीचे सर्व विधी करताना दिसत आहेत. आपल्या बहिणीच्या आनंदात आनंदित झालेल्या त्या दोघीही सावलीसारख्या अंशुलाच्या बाजूला उभ्या होत्या. या फोटो मध्ये ती खुप आंनदी दिसत आहे. आणि सध्या सोशल मिडियावर अंशुलाच्या पोस्टला सर्व चाहते शुभेच्छा देत आहेत.
सनी देओलचा बदललेला लूक चर्चेत; ‘रामायण’ पूर्वी दिसला क्लीन-शेव अवतार


