आमिर खान हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याला लोक प्रेमाने बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट असे म्हणतात. आणि त्याचा नुकताच तिसरा विवाह पार पडला आहे. त्याने रविवार, 5 जुलै रोजी जुहू येथील त्याच्या घरी एका खाजगी समारंभात त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटशी लग्न केले. या सोहळ्याला आमिरची तीन मुले, आयरा खान, जुनैद खान आणि आझाद, या विशेष प्रसंगी त्यांच्या वडिलांसोबत होते आणि गौरीचा मुलगाही उपस्थित होता. तसेच काही जवळची मंडळी या सोहळ्याला हजर होती.
आमिर (amir)आणि गौरी लग्नानंतर आता एका ठीकाणी स्पाट झाले होते. त्यावेळेचे त्याचे फोटो आता समोर आले आहेत. ज्यात ते दोघेही कॅज्युअल पोशाखात दिसत आहेत. हे दोघे अभिनेत्याच्या इमारतीखाली दिसले, जिथे ते लग्नानंतर पाहुण्यांना निरोप देताना दिसले. आमिर प्रिंटेड कुर्त्यामध्ये दिसला, तर गौरीने कॅज्युअल टी-शर्ट आणि पायजमा घातला होता. मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते गौरीच्या अनामिकेतील अंगठीने, जी एका मोठ्या हिऱ्यामुळे चमकत होती.
आमिर खान आणि गौरी स्प्रॅटच्या लग्नानंतर, त्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहेत. त्याच्या विवाहच्या वेळी कागदपत्रांवक सह्या करताचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात व्हिडिओ मध्ये पाहले तर मी, गौरी स्प्रॅट, माझा रक्षक आणि आधारस्तंभ असलेल्या आमिर खानला माझा कायदेशीर पती म्हणून स्वीकारते.” त्यानंतर आमिर गौरीच्या हाताचे चुंबन घेतो, तिला मिठी मारतो आणि ते एकत्र नाचतात. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट आता अधिकृत नवरा बायको झाले आहेत.
बोनी कपूरची लेक अंशुला कपूर अडकली विवाहबंधनात, तर या लेखकांसोबत घेतले सात फेरे


