‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक जान कुमार आणि गायक कुमार सानू यांचा मुलगा यांचा मुलगा जान कुमार सानू यांच्या हेल्थबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्याला कोविड-19 चाचणीची केल्यावर ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्याला लगेच मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना 12 जुलै रोजी रुग्णालयातून जानने एक व्हिडिओ शेअर केली आहे त्यातुन ही माहीती मिळाली आहे.
गायक कुमार सानू (kumar sanu)यांचा मुलगा आणि ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक जान कुमार सानू याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या मुळे आता चाहत्यांना काळजी वाटत आहेत. जान कुमार सानूने रुग्णालयातून एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने चाहत्यांना त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. घाबरण्याऐवजी, आपल्या तब्बेतीची अपडेट सांगताना त्यानी वीनोदी सुर लावला. व्हिडिओमध्ये, तो रुग्णालयात फिटनेस चेक व्हिडिओ चित्रित करताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “माझा चीनहून आलेला मित्र, कोविडला सलाम.” रुग्णालयात दाखल होण्याबद्दल विनोद करत
जानने त्याचा व्हिडिओ शेअर केला, पण त्याला लक्षणे कधीपासून जाणवू लागली किंवा डॉक्टर त्याला किती काळ निरीक्षणाखाली ठेवणार आहेत, हे त्याने उघड केले नाही. दरम्यान, त्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते खूप चिंतेत पडले आहेत. अनेकजण कमेंट्सद्वारे त्याच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत आणि तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. तर चाहत्यानी पोस्टच्या कमेंड मध्ये लवकर बरा हो जान असे म्हणले आहे.
हेही वाचा
‘धमाल 4’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, अजय देवगणच्या चित्रपटाने मोडले अनेक विक्रम










