अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी आणि जावेद जाफरी अभिनीत ‘धमाल 4’ हा चित्रपट रीलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शिन इंद्र कुमार यांनी केले आहे. हा चित्रपट 10 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असुन या प्रेक्षाकांकडुन याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीनी यातील विनोदाचे कौतुक केले आहे. तर काहीनी म्हणले आहे याची कथा अजून चांगली असु शकली असती. तरीही संमिश्र प्रतिसाद मिळूनही, चित्रपटाने आठवड्याच्या शेवटी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या शनिवारी चित्रपटाने तब्बल कमाई मध्ये 60% वाढ नोंदवली आहे.
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘धमाल (Dhamal)4′ ने पहिल्या रविवारी देशभरातील 11,480 शोजमधून 28.50 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. यामुळे चित्रपटाची पहिल्या तीन दिवसांतील एकूण कमाई 65 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर एकूण कमाई 78 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपटाची जगभरातील कमाई 92 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, म्हणजेच तो काही दिवसांतच 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल.
बॉक्स ऑफिसवरील सध्याच्या स्पर्धेत, ‘धमाल 4’ ने अजय देवगणच्या अलीकडील चित्रपटांपेक्षा खूपच चांगली कामगिरी केली आहे. आपल्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत, ‘दे दे प्यार दे 2’ ने 11,944 शोज होऊनही तिसऱ्या दिवशी 13.75 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे त्याची तीन दिवसांची एकूण कमाई 34.72 कोटी रुपयांवर पोहोचली. दुसरीकडे, ‘सन ऑफ सरदार 2’ ने आठवड्याच्या अखेरची एकूण कमाई 24.75 कोटी रु. कमाई केली आहे. या आकडेवारीनुसार, ‘धमाल 4’ ने उत्तम कमाई केली आहे. आणि जर त्याने कामकाजाच्या दिवसांमध्ये हीच गती कायम ठेवली, तर तो बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवू शकतो.
हा चित्रपट ‘धमाल’ फ्रँचायझीमधील चौथा भाग असुन. 2019 च्या ‘टोटल धमाल’ चित्रपटाच्या या सिक्वेलमध्ये मुख्य कलाकारांसोबतच रवी किशन, संजय मिश्रा, उपेंद्र लिमये, अंजली आनंद, संजीदा शेख, ईशा गुप्ता आणि विजय पाटकर हे सुध्दा अनुभवी कलाकांर यात आहेत.
हेही वाचा
समय रैनासोबतचा कुशा कपिलांचा बनावट AI फोटो व्हायरल, जुन्या वादाला पुन्हा उधान










