Friday, July 17, 2026
Home बॉलीवूड अक्षयच्या 25 कोटींच्या नोटिशीवर अखेर बोलले परेश रावल, ‘हेरा फेरी’ माझ्यासाठी केवळ चित्रपट नाही…

अक्षयच्या 25 कोटींच्या नोटिशीवर अखेर बोलले परेश रावल, ‘हेरा फेरी’ माझ्यासाठी केवळ चित्रपट नाही…

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘हेरा फेरी 3’ यातील कलाकार मुख्य कलाकार म्हणजेच परेश रावल, अक्षय कुमार आहेत. तर गेल्या वर्षी, ज्येष्ठ अभिनेते परेश रावल हे या चित्रपटातुन बाहेर पडतो असे म्हणताच याचा मोठा वाद झाल होता. रावल यांच्या या निर्णयामुळे चित्रपटाचे सह-निर्माते आणि अभिनेते अक्षय कुमारने कराराचा भंग आणि नुकसान केल्याचा आरोप केला होता. त्यांना 25 कोटीची नोटीस पाठवली होती. मात्र काही वेळानंतर त्यांनी त्यांचा विचार बदलला आहे. आणि चित्रपटात पुन्हा परण्याची सहमती दाखवली आहे. मात्र या आता त्यानी का चित्रपट सोडला होता अन् वाद का झाला होता याबाबत त्यानी माहीती सांगितली आहे. 

परेश रावल यांनी एका मुलाखती दरम्यान स्पष्ट केले की, त्यांचा निर्णय कोणत्याही वैयक्तिक अस्वस्थतेमुळे किंवा अक्षय कुमार यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे नव्हता. त्यांनी स्पष्ट केले, “ही पूर्णपणे करारनाम्याच्या बंधनाची बाब होती.” जर मला हा चित्रपट करायचा होता, तर मला निर्माते फिरोज नाडियाडवाला यांची अधिकृत परवानगी आवश्यक होती, कारण ते ‘हेरा फेरी’ फ्रँचायझीचे एकमेव मालक आहेत.

मात्र पुढे ते म्हणाले की, अक्षय (akshay)कुमारकडून आलेल्या कायदेशीर नोटीसमुळे ते खूप अस्वस्थ झाले होते. मी विचार केलो मी इथे चित्रपटाचा आंनद घेण्यासाठी आलो आहे. ना की कायदेशीर वादात अडकण्यासाठी.., त्या निराशेपोटी मी ठरवले की मला या चित्रपटाचा भाग व्हायचे नाही.” अन् ते म्हणाले की, अक्षयने जी नोटीस पाटवण्याची टोकाची भुमिका घेतली ती एक भावनिक प्रतिक्रिया होती. ‘परेश मला नकार कसा देऊ शकतात?’ त्यामुळे त्याने भावनिक दृष्ट्या दुखावुन त्याने असे केले.

फिरोज नाडियाडवाला यांची मंजुरी मिळण्यास विलंब का झाला आणि नेमकी अडचण कुठे होती, हा वाद पूर्णपणे अक्षय आणि फिरोज यांच्यात होता आणि त्यांना त्यात मला मधी पडायचे न्हवतो, “फिरोज भाईंची परवानगी का मिळाली नाही, हा अक्षय आणि त्यांच्यातील परस्पर संमतीचा प्रश्न होता.  माझ्या आणि अक्षयच्या नात्यात कधीही कटुता किंवा दुरावा निर्माण झाला नाही. मात्र आता सगळे प्रश्न सुटले आहेत.

हेही वाचा

अर्चना पूरण सिंहने हे क्षेत्र निवडल्याने शिक्षक झाले भावुक? घ्या सविस्तर जाणुन

 

हे देखील वाचा