अर्जुन कपूर हा एक लोकप्रिय कलाकार आहे. त्याने आतापर्यत अनेक चित्रपटे केली आहेत. आणि ती गाजली देखील आहेत. नुकतेच त्याच्या बहिणेचे लग्न पार पडले त्यामुळे तो सोशल मिडियावर हि खुप ऍक्टिव दिसला. तसेच त्याच्या प्रेमजीवनाबाबत नेहमीच तो चर्चेत राहीला आहे. तर ‘लॉक अप 2’ मध्ये पामेलाला गंमतीने प्रपोज केल्यानंतर अर्जुन साहिबासोबत दिसला होता. अलीकडेच, अर्जुन कपूर आणि साहिबा बाली लंडनमध्ये एकत्र दिसले, ज्यामुळे ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अभिनेत्री साहिबा (sahiba)रविवार, 19 जुलै 2026 रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर एकत्र दिसले होते. स्टेडियममधील त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आणि आता नेटकरी या कमेंट करत आहेत. ते म्हणत आहेत की, “ते एकत्र आहेत का? ती दुसऱ्या कोणासोबत नव्हती का?” दुसऱ्या युझरने कमेंट केली, “काय चाललंय?” तिसऱ्याने लिहिले, “काय शिजतंय?” असे अनेकजण आंदाज लावत आहेत.
मात्र या सर्वबाबींवर अजुन या दोघांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. पण साहिबा बालीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अर्जुन कपूरसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांना आंदाज लावायला अजुन भाग पडतं. अर्जुनला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा साहिबाने एका मजेशीर इंस्टाग्राम स्टोरी ठेवुन दिल्या होत्या अन् मग तेव्हा पासुन त्याच्या नात्याबाबत अफवांना सुरुवात झाली आहे. मात्र 2025 मध्ये साहिबाचे नाव क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरसोबत जोडले गेले होते.
हेही वाचा
घटस्फोटानंतर तब्बल 12 वर्षांनी जेनिफर विंगेटने केला दुसरा विवाह










