Wednesday, July 22, 2026
Home साऊथ सिनेमा ‘जना नायकन’मधील विजयचा धडाकेबाज लूक व्हायरल, या तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित

‘जना नायकन’मधील विजयचा धडाकेबाज लूक व्हायरल, या तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित

थलपती विजयचा आगमी चित्रपट ‘जना नायकन’ यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते मात्र आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आणि या चित्रपटाचा नुकताच पहिला प्रोमो रीलीज झाला आहे. या प्रोमो सोमवारी रीलीज झाला असुन यात विजय दमदार अवतारात दिसला आहे. पण यापूर्वी यावर्षी जानेवारीमध्ये पोंगलच्या मुहूर्तावर ट्रेलर प्रदर्शित झाला होता, त्यानंतर कोणताही नवीन व्हिडिओ कंटेंट प्रदर्शित झाला नव्हता.

मात्र या नवीन प्रोमोमध्ये विजय (viajy)एका दमदार ॲक्शन दिसत आहे. तो बंदुका चालवताना आणि खतरनाक स्टंट करताना दिसतो. प्रोमोचे मुख्य आकर्षण म्हणजे शेवटचा शॉट, ज्यामध्ये विजय पोलिसांच्या गणवेशात दिसतो. या दृश्यामुळे, चित्रपटातील त्याची भूमिका एका कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याची असल्याच्या अंदाज लागतो.

‘जना नायकन’ चित्रपट रिलीज पुर्वीच वादग्रस्त राहिला आहे. जानेवारीमध्ये ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रावरून चित्रपट वादात सापडला होता. दरम्यान, चित्रपटाची एक एचडी आवृत्ती ऑनलाइन लीक झाली, ज्यामुळे हा प्रकल्प जवळपास सहा महिने थांबला होता. या कठीण काळात, निर्मात्यांनी कोणतेही नवीन फुटेज प्रदर्शित केले नाही अन् केवळ पोस्टर्स, प्रदर्शनाच्या तारखा आणि गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत राहिले आहेत.

मात्र हा चित्रपट विजयच्या कारकिर्दितील एक महत्वाचा टप्पा आहे. कारण त्याच्या या प्रवासातील हा त्याचा शेवटचा चित्रपट आहे. मात्र दिग्दर्शक एच. विनोद यांच्या मते, हा चित्रपट विजयचा शेवटचा चित्रपट नसुन तो मुख्यमंत्री विजयचा पहिला चित्रपट आहे. आणि हा चित्रपट 23 जुलै रिलीज होणार आहे.

‘लॉकअप २’ मधील किसिंग सीनमुळे वाद ! श्रेया कालराने राम कपूरवर टीका करताना म्हटले, ‘माझे वडीलसुद्धा…’

हे देखील वाचा