अनेक अडथळे पार करुन आता थलपती विजय अभिनीत ‘जना नायकन’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपुर्वी सेन्साॅर बोर्डासोबतचे संघर्ष आणि चित्रपट लीक या कारणामुळे चित्रपटाच्या रिलीजच्या तारखा पुढे गेल्या आहेत. मात्र आता हा चित्रपट या आठवड्यात रिलीज होणार आहे. तर आता प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी खुप उत्सुक आहेत. तसेच हा चित्रपट विजयचा अभिनय क्षेत्रातील लास्ट चिटपट असणार आहे.
‘जना नायकन’ या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला रवीवार पासुन सुरुवात झाली होती. आणि या 4 दिवसांत चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगच्या कमाईमुळे अनेक मागील विक्रम मोडले आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा चित्रपट पहिल्याच दिवशी 100 कोटींहून अधिक जागतिक कमाई करून बॉक्स ऑफिसवर इतिहास रचेल.
‘जना नायकन’ देशभरात आणि जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित करण्याची योजना आहे. भारतात सुमारे 8000 शो आयोजित करण्याचे नियोजन आहे, त्यापैकी 3500 हून अधिक शो एकट्या तामिळनाडूमध्ये दाखवले जातील. आकडेवारीनुसार, बुधवार सकाळपर्यंत चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमधून 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. ब्लॉक सीट्ससह, हा आकडा 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, हा चित्रपट तमिळ (tamil)भाषिक असल्याने बाकीच्या राज्यात तिकीटांची कमी विक्री होत आहे.
‘जना नायकन’ साठी परदेशातही प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटाला विशेषतः उत्तर अमेरिका, मध्य पूर्व आणि आग्नेय आशियामध्ये जोरदार प्रतिसाद मिळण्याची शक्यता दिसत आहे. अंदाजानुसार हा चित्रपट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पहिल्या दिवशी 4 दशलक्ष कमाई करेन आणि भारतात 100 कोटी ते 105 कोटीपेक्षा कमाई करणारा हा 19वा भारतीय आणि तिसरा तमिळ चित्रपट ठरेल.
राष्ट्रीय पुरस्कारानंतर कार्तिक आर्यनने घेतले महाकालाचे दर्शन; कुटुंबासोबत मनोभावे केली शयन आरती










