Friday, July 24, 2026
Home बॉलीवूड ‘रामायण’चा ट्रेलर लांबणीवर, या कारणासाठी मेकर्सनी बदलली तारीख

‘रामायण’चा ट्रेलर लांबणीवर, या कारणासाठी मेकर्सनी बदलली तारीख

‘रामायण’ हा एक या वर्षातील बहुप्रतिक्षीत चित्रपट आहे. या चित्रपटाबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 24 जुलै रोजी आता प्रर्दर्शित होणार नाही. कॉमिक-कॉन प्रीमियरनंतर या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर ऑनलाइन प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी ही अचानक आलेली बातमी खुप आश्चर्याची ठरली आहे. 18 जुलै रोजी रामायणचा ट्रेलर दिल्ली मध्ये झाला होता. मात्र हा ट्रेलर अजुन यूट्यूबवर प्रदर्शित झाला नव्हता. त्यामुळे ट्रेलर पाहण्याची वाट पाहणाऱ्या सर्वांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

नितेश (nitesh)तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटातील कलाकारांची नावे समोर आली असुन प्रेक्षक आता या चित्रपटांच्या ट्रेलरची वाट पाहत असतानाच आता या ही योजना बदलली आहे. तर आता निर्मात्यांनी जाहीर केले आहे की, ‘रामायण’ने सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटसोबत भागीदारी केली असून ते जगभरात ‘रामायण’चा ट्रेलर प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत. त्यांनी हे भारतीय महाकाव्य जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे.

नमित मल्होत्रा ​​यांनी शुक्रवारी सकाळी एका पोस्टमध्ये स्पष्ट केले की, ट्रेलरचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे, कारण निर्मात्यांनी सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटसोबत एक मोठा आंतरराष्ट्रीय वितरण करार केला आहे. तसेच यातुन जगालाच या ट्रेलरचा आंनद घेता येइल.

चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनावर जोर देत, नमित मल्होत्रा ​​यांनी त्याच पोस्टमध्ये लिहिले, “भारतीय चित्रपटसृष्टीच्या १०० वर्षांहून अधिकच्या इतिहासात हा एक अभिमानाचा क्षण असेल, जेव्हा रामायण एखाद्या मोठ्या जागतिक हॉलिवूड चित्रपटाप्रमाणे जगभरात प्रदर्शित होईल.

हेही वाचा

‘इंडियन आयडॉल 16’च्या महाअंतिम सोहळ्याला विशाल ददलानीची अनुपस्थिति, जाणुन घ्या नेमके कारण

हे देखील वाचा