[rank_math_breadcrumb]

खेसारी लाल यादव यांच्या व्हायरल क्लिपवर या अभिनेत्रीचा संताप; प्राण्यांशी अशा वागणुकीला केला विरोध

मलायका अरोरा हि एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती नेहमी तिच्या फॅशन सेन्समुळे आणि तिच्या वैयक्तिक कारणामळे चर्चेत असते. मात्र ती सध्या एका सुपरस्टारने प्राण्याशी नीट न वागल्याने नाराजी व्यक्त केली आहे.  भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव यांच्या व्हायरल व्हिडिओत भटक्या कुत्र्याला वाईट वागणूक दिलीलं दिसत आहे. त्यावर अभिनेत्री नाराज झाली आहे. आणि तीने यावर इंस्टाग्राम स्टोरी द्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने स्टोरीतुन म्हटले आहे की, सर्वांना माहीत आहे की ‘छाया छाया गर्ल’ ही एक श्वानप्रेमी आहे आणि प्राण्यांना त्रास देणाऱ्यांविरुद्ध ती आवाज उठवते. आता, याच कारणामुळे अभिनेत्रीची इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत आहे. तसेच तीने हा व्हिडिओ शेअर करत मलायकाने लिहिले, “हे लोक कोण आहेत??? आणि तिथे पोज देणारा हा माणूस कोण आहे???

तर या व्हायरल क्लिपमध्ये, खेसारी लाल यादव एका इव्हेंटच्या स्टँडीसमोर पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहेत, तर एक भटका कुत्रा त्यांच्या पायाशी हिरव्या कार्पेटवर शांतपणे बसलेला आहे. सुरुवातीला, फोटो काढण्यासाठी अभिनेत्री कुत्र्याला हलकासा इशारा करते, पण कुत्रा जागेवरून हलत नाही. त्यानंतर एक सहाय्यक जवळ येतो आणि कुत्र्याला दूर ढकलतो. त्यानंतर एक महिला कुत्र्याला शिवीगाळ करताना दिसते.

तर यावर अभिनेत्रीने खेसारी लाल यादव (yadav)नाव घेतले नाही, कारण ती त्यांना ओळखत नाही, मात्र तीने हे स्पष्ट केले आहे की, तीला ही घटना फार विचीत्र वाटली. आणि ती अनेकदा पाळिव प्राण्यांसोबतचे फोटो, व्हिडोतुन समोर येते. तसेच ती जीम ला जाताना भटक्या कुत्रांना मायेने कुरवताना सोशल मिडियाच्या अनेकदा दिसली आहे.  म्हणजेच ती एक डाॅग लवर आहे.

‘जना नायगन’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात, पहिल्याच दिवशी चित्रपटाने केली इतकी कमाई