अभिनेत्री रश्मिका मंदानाला मैसा चित्रपटाच्या डान्स सिक्केन्सच्या चितत्रीकरणादरम्यान तिला हिप दुखापत झाली होती. आणि या वर तीने आता तिच्या हेल्थबाबत अपडेट दिली आहे. तिने याबाबत अपडेट देताना म्हणले की, ‘मैसा’च्या डान्स शूटदरम्यान ही दुखापत झाली. तिने सांगितले की ही तिची सलग तिसरी दुखापत आहे आणि तिच्या उजव्या हिपमधील एक टेंडन निखळले आहे. पाय व्यवस्थित उचलण्यासाठी ते पुन्हा जोडणे आवश्यक आहे.
रश्मिका (rashmika)मंदानाने सेल्फी, कुकीज आणि पझल्स शेअर केले आहे. या पोस्ट मध्ये शुभेच्छा आणि फुलांचा गुच्छा आणि तिच्या पाळीव कुत्र्यांची झलक दिसत आहे. रश्मिकाने या पोस्ट मध्ये फक्त हाय गाईज असे म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे. दुखापत खुप वाईट आहे, तसेच कोणालाही कळु नये अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच ती काहि काळ गायब होती त्यामुळे तीने माफी मागितली. आणि तीने म्हणले की, पण हाय, मी परत आले आहे. “रश्मिका मंदानाने खुलासा केला की, ही दुखापत काही काळापूर्वी झाली होती आणि तिला आराम करण्यास सांगितले होते. आणि वेदना होतात, पण त्या असह्य नाहीत, एवढंच.
रश्मिका मंदानाने तिच्या नियमित व्यायामाची आठवण येत असल्याचेही सांगितले. ती म्हणाली की तंदुरुस्त राहण्यासाठी ती नियमितपणे व्यायाम करते आणि धावते. तिने गंमतीने म्हटले की, जर तिला व्यायाम करता आला नाही, तर ती खूप खाईल आणि वाळवंटातील राक्षस बनेल. तिने चाहत्यांना काळजी न करण्याचे सांगितले आणि गरज पडल्यास ती परत येईल असेही सांगितले.
हेही वाचा
अनुपम खेर यांच्या रीलची सोशल मीडियावर चर्चा; चाहते म्हणाले, हेच खरे ट्रेंड विनर्स










