रवीना टंडन हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती अनेक वर्षानी भुत बंगला या चित्रपटाच्या निमत्ताने चित्रपटात दिसली जो काहिच दिवसांपुर्वी रिलीज झाला होता. तर आता ती पंकज त्रिपाठी यांच्या ‘ओह माय डॉग’ या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला उपस्थित होती, जिथे चित्रपटातील मुख्य कुत्र्याने तिच्यावर अचानक हल्ला केला मात्र तिला कोणतीही इजा झाली नाही. पण या प्रंसगी तीने न घाबरता ही परस्थिती उत्तम हातळली, या प्रंसगाचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
रवीना टंडनच्या या व्हिडिओचे आता सोशल मिडियावर कौतुक होत आहे. ह माय डॉग’ या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग मुंबईत आयोजित करण्यात आले होते. आणि तिथे रवीना हि स्टायलिश लुक मध्ये दिसत होती, तीन चित्रपटातील कलाकार आणि मुख्य कुत्र्यासोबत फोटोसाठी पोज दिली मात्र या फोटोनंतर कुत्र्याने तिच्या ड्रेसचा एक धागा कुत्र्याच्या तोंडात ओढला. मात्र यावेळी रवीना मागे हटण्याऐवजी तीने कुत्र्याला शांत केले.
‘ओह माय डॉग’ या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग मुंबईत आयोजित करण्यात आले होते, जिथे रवीना स्टायलिश दिसत होती. तिने चित्रपटातील कलाकार आणि मुख्य कुत्र्यासोबत फोटोसाठी पोज दिली. मात्र, फोटोसाठी पोज दिल्यानंतर ती उठल्यावर कुत्रा रागाने भुंकला आणि तिला चावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गोष्टींनी एक धक्कादायक वळण घेतले. तिच्या ड्रेसचा एक धागा कुत्र्याच्या तोंडात अडकला. या संपूर्ण घटनेदरम्यान रवीना शांत राहिली आणि मागे हटण्याऐवजी तिने कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. रवीना टंडन एक श्वानप्रेमी देखील आहे.
हा चित्रपट अमित राय दिग्दर्शित असुन पंकज त्रिपाठी यांच्या व्यतिरिक्त, या चित्रपटात पवन (pawan)मल्होत्रा, माही राय, राजेश कुमार, गीता अग्रवाल, विजय मिश्रा, श्रीधर दुबे, बुलू कुमार आणि सुलक्षणा बरुआ हे उत्तम कलाकार यात आहेत.
हेही वाचा
राजपाल यादव याच्या घरावर बँकेची नोटीस, एवढ्या कोटींच्या कर्जप्रकरणामुळे वाढल्या अडचणी










