तामिळनाडुचे मुख्यमंत्री आणि अभिनेता जोसेफ विजय आणि त्यांच्या पत्नी संगीता यांच्यात काहि दिवसांपासुन वाद सुरु होता आणि या वादाला आता एक सुखद वळण मिळाले आहे. विजयची पत्नी संगीता यांनी स्थानिक चेंगलपट्टु कुंटुंब न्यायालयात दाखल केलीली घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे. काहि अनेक महिन्यापासुन हे प्रकरण प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळात एक चर्चेचा विषय बनले होते. मात्र आता नवीन वृतानुसार त्यांच्यात सलोखा झाल्याच स्पष्ट होत आहे. तर त्याचे हे नाते 27 वर्षाचे होते. त्याच्यातील नाते वाचल्याने आता चाहत्यांना हि दिलासा मिळाला आहे. तसेच न्यायालयाचा हा तोडगा आणि त्याच्यातील सलोखा वाढवेल आणि कटुता कमी करेल.
संगीता यांनी फेब्रुवारीमध्ये विजय विरोधात दाखल केली होती ज्यात तिने आरोप केली होता की विजय यांचे दुसऱ्या एका अभिनेत्री सोबत अनैतिक संबंध होते, आणि त्याना हे 2021 मध्येच समजले होते. त्यामुळे विजयशी तलाख घेण्याचा निर्यण घेतला होता.
संगीता (sangita)सोरनालिंगम विजयची जरी पत्नी असली तरी ती तिचे आयुष्य माध्यमांपासुन दुर आणि साधेपणात घालवले होते. ती मुळची श्रीलंकन तमिळ पार्श्वभुमीच्या संगीता यांचा जम्न आणि संगोपण युकेमध्ये झाले. आणि विजय संगीता याचे लग्न 25 ऑगस्ट 1999 रोजी झाले. त्यांना दोन मुले आहेत: मुलगा जेसन संजय आणि मुलगी दिव्या साशा. चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व असूनही, संगीता यांनी प्रसिद्धीपासून दूर राहून नेहमीच कौटुंबिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य दिले आहे.
विजय आणि संगीता कहाणी खुप रंजक आहे. संगीता ला विजयचा अभिनया खुप आवडायचा मग त्या फक्त पत्र पाठवत असत.एकदा तर विजयला भेटण्याच्या उत्सुकतेने थेट लंडनहून चेन्नईला आल्या. त्यांनी शूटिंगचे ठिकाण शोधून काढले आणि सेटवर त्याची भेट घेतली. यामुळे ओळख आणि संभाषण सुरू झाले, जे पुढे जाऊन आयुष्यभराच्या नात्यात रूपांतरित झाले.
हेही वाचा










