दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना खुशी कपूरशी (khushi kapoor) संबंधित कथित अश्लील मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले. तिच्या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धी हक्कांचा वापर करून परवानगीशिवाय विकल्या जाणाऱ्या उत्पादनांशी संबंधित मजकूर काढून टाकण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी आज खुशी कपूरच्या याचिकेवर सुनावणी घेतली.
तिच्या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धी हक्कांच्या संरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने हे निर्देश दिले. अंतरिम मनाई हुकुमासाठीच्या तिच्या याचिकेसंदर्भात कपूरच्या बाजूने ‘जॉन डो’ आदेश जारी केला जाईल, असे संकेत न्यायालयाने दिले.
अशा आदेशामुळे तिच्या ओळखीचा अनधिकृत वापर किंवा शोषण करू शकणाऱ्या अज्ञात व्यक्तींपासून संरक्षण मिळेल. दिल्ली उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठाने खुशी कपूरची बहीण जान्हवी कपूरच्या हक्कांचे उल्लंघन करणारा कथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा आदेश आला आहे.
हेही वाचा
पूर्व पतीने दुसऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर केल्यावर उर्मिला मातोंडकर हिची खोचक पोस्ट










