2007 साली आवारापन हा चित्रपट आला होता. आणि त्यावेळी या चित्रपटाला भरपुर पंसती मिळाली होती. आणि आता जवळपास 19 वर्षानी आवारापन 2 हा चित्रपट आला आहे. हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटांच्या सिक्वेल अनेक चाहते खुश होते. आणि जेव्हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर फारसा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला नव्हता. मात्र काहि काळातच यातील गाणे आणि कथा प्रेक्षकांना आवडु लागले. तसेच यातील कलाकारांचा अभिनय आवडु लागला. आणि इम्रान हाश्मीच्या उत्कृष्ट अभिनयाने तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला.
‘अवारपन 2’ हा चित्रपट 14 तारखेला म्हणजेच आज चित्रपटगृहात रीलीज झाला आहे. आणि चित्रपट रीलीज होताच. अनेत प्रेक्षकांनी सोशल मिडीयावर रिव्हिव दिले आहेत. तसेच अभिनेत्याच्या दमदार पुनरागमनचे आणि त्याच्या अभिनयाचे आता कौतुक होत आहे. चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. चाहते शिवम पंडितच्या पात्राच्या पुनर्जन्माचे आणि इम्रान हाश्मीच्या पडद्यावरील प्रभावी उपस्थितीचे कौतुक करत आहेत.
एका X वापरकत्याने लिहले आहे की, पहिली 20 मिनेटेच हे सांगायला पुरेशी आहेत की हा चित्रपट ब्लाॅकबस्टर ठरणार आहे. तर दुसऱ्याने म्हणले की, हा चित्रपट खुपच उत्तम आहे. या गंभीर वातावरण, दमदार अभिनय, संगीत, आणि प्रेम आणि त्यागाचे विषय हे सारं खुप उत्तम अनुभव देणारं आहे. आश्या प्रकारचे अनेक चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
हा चित्रपट रिलीज होताच याच अजुन चित्रपट रिलीज झाल्याने ‘अवारपन 2′(awarapan) ला बॉक्स ऑफिसवर तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. हा दुसरा चित्रपट म्हणजे सनी देओल यांचा ‘पार्टिशन 1947’ या चित्रपटाशी स्पर्धा होत आहे. दोन्ही चित्रपट अगदी उत्तम विषय आणि दिग्गज कलाकांर असल्याने कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम ठरले हे पाहण्यासारखे आहे.
हेही वाचा
सोनू निगमने मुंबईच्या प्राइम लोकेशनवर घेतली येवढ्या कोटींची नवी कमर्शियल स्पेस










