Saturday, August 15, 2026
Home बॉलीवूड मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय…, गोविंदाला या अभिनेत्रीसोबत पाहून सुनीता आहुजा संतापल्या

मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय…, गोविंदाला या अभिनेत्रीसोबत पाहून सुनीता आहुजा संतापल्या

गोविंदा हा एक बॉलिवूड लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतपर्यत अनेक उत्तम चित्रपटामधुन प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. मात्र काही गेल्या वर्षात त्याने कोणतेही चित्रपटात काम केले नाही. मात्र तो आता एका चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी ‘रूपा’ चित्रपटातील सह-अभिनेत्री कोमल राणी सोबत गोविंदा मुंबई विमानतळावर दिसला होता. त्यानंतर पापाराझींनी सुनीता आहुजाची प्रतिक्रिया याबाबत प्रतिक्रिया जाणुन घेण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी सुनिता ही प्रचंड चिडली होती. 

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जेव्हा पापाराझीनी गोविंदा आणि कोमल याच्या सततच्या प्रमोशनवर प्रश्न विचारला तेव्हा सुनीताने नाराजी व्यक्त केली ती म्हणाली की प्रमोशन सहसा चित्रपट बनल्यानंतर सुरु करतात. पण इथे तर चित्रपट बनण्यापुर्वीच ते एकत्र फिरत आहेत. आणि ती पुढे म्हणाली की, गोंविदा आपल्या वयाच्या पोरीसोबत फिरत आहे आणि त्याला याची लाज वाटली पाहिजे.

तसेच याशिवाय त्यानी कोमलच्या पोशखावर टिप्पणी केली आणि गोविंदाला ‘शुगर डॅडी’ संबोधून टोमणा मारला. या प्रंसगावर गोविंदा म्हणाला की, या वादात विनाकारण ओढले जाऊनही कोणाबद्दलही वाईट न बोलल्याबद्दल तो कोमलचा मी अत्यंत आभारी आहे. गोविंदाच्या मते, कोमल एक शांत, संयमी कलाकार आहे, जी अशा वादांमधून रातोरात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीय.

हेही वाचा

‘आवारापन 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, ‘पार्टिशन 1947’ला मागे टाकत पहिल्याच दिवशी केली इतकी कमाई

हे देखील वाचा