Wednesday, August 19, 2026
Home बॉलीवूड बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मिर्झापूर: द मूव्ही’मधील हे गाणे झाले रिलीज

बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मिर्झापूर: द मूव्ही’मधील हे गाणे झाले रिलीज

आजकाल प्रेक्षक ओटीटी वरील मालीका आणि चित्रपट जास्त पाहत आहेत. आणि याच ओटीटी रीलीज झालेली उत्तम सीरीज म्हणचे मिर्झापूर. या सीरीजला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले होते. कारण यातील उत्सुकता वाढवणारी कथा आणि क्राईम थ्रिलरमुळे सीरीज गाजली हि सीरीज प्रेक्षकांना प्रंचड आवडल्याने त्यांच्यावर आता चित्रपट येत आहे, आणि या चित्रपटातील पहीले गाणे ‘वरुण फॉरएव्हर’ देखील प्रदर्शित झाले आहे, आणि त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. 

नुकताच ‘मिर्झापूर: द मुव्ही’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे वृत्त आहे की, चित्रपटाची कथा मालिकेपेक्षाही अधिक धोकादायक असणार आहे. आणि आता त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबाबत अधिक उत्सुकता जाणवत आहे. या चित्रपटात अली फजल, पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, श्वेता त्रिपाठी आणि श्रिया पिलगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘मिर्झापूर: द मुव्ही’ या चित्रपटाचे गाणे रिलीज झाले असुन हे गाणे ‘मिर्झापूर‘ (mirzapur)मालिकेतील लोकप्रिय ‘वरुण’ गाण्याची एक नवीन आवृत्ती आहे, ज्यात मूळ गाण्याचा आत्मा जपण्यात आला असुन हे रोमँटिक गाणे श्रेया घोषाल आणि रोमी यांनी गायले आहे.

‘मिर्झापूर: द मुव्ही’चे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांना केले आहे, या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खुप आतुर आहेत, आणि हा चित्रपट 4 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहामध्ये होणार आहे.

हेही वाचा

जेसन संजयच्या ‘सिग्मा’ची नवी रिलीज डेट जाहिर, आता ‘दृश्यम 3’सोबत होणार टक्कर

हे देखील वाचा