करीना कपूर खान हि एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आतपर्यत अनेक चित्रपटे केली मात्र काही वर्षापासुन ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही मात्र ती सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते. नाहीतर कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती नुकतीच एका कारणामुळे चर्चेत आली होती. ती जीमच्या बाहेर पडताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तीचे पोट बेबी बंप सारखे दिसत होते. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी ती पुन्हा गरोदर आहे का असे म्हटले.. मात्र करीना कपुरच्या टिमने आणि सबा यांनी या अफवा फेटाळुन लावल्या. आणि आता यावर अभिनेत्रीने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.
करीनाने (Kareena)एक युझरची इन्स्टा पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. ज्यामध्ये ती बेबी बंप दाखवत पोज देत आहे आणि मागे एक ‘हम आपके हैं कौन…’ चित्रपटातील ‘चॉकलेट, लाईम ज्यूस’ हे गाणे वाजत आहे. व्हीडोओचे कॅप्शन अस्पष्ट आहे, परंतु त्यात पिझ्जा आणि हसणारा इमोजी आहे. करिनाने आता हा मिरर सेल्फी पुन्हा शेअर केला आहे, आणि त्याला move away be असे कॅप्शन दिले आहे. आणि त्यासोबत हसणारा आणि पिझ्झा इमोजी दिला आहे.
काही दिवसांपुर्वी ही करीना बाबत अश्याच गरोदरपण्याच्या अफवा पसरल्या होत्या मात्र, अभिनेत्रीने स्पष्ट केले की पिझ्झा आणि वाईनमुळे तिचे पोट फुगले होते. आणि अलीकडे परत सुरू झालेल्या अटकळांच्या दरम्यान करिनाची ही नवीन इंस्टाग्राम स्टोरी समोर आली आहे.
हेही वाचा
करीना कपुरच्या तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चेवक सबा अली खान भडकल्या म्हणाल्या – जगा आणि जगू द्या










