Tuesday, September 1, 2026
Home बॉलीवूड गौरव खन्नाचं खतरों के खिलाडी 15 मध्ये धडाकेबाज कमबॅक? या कारणामुळे होते शो मधुन बाहेर

गौरव खन्नाचं खतरों के खिलाडी 15 मध्ये धडाकेबाज कमबॅक? या कारणामुळे होते शो मधुन बाहेर

‘खतरों के खिलाडी’ हा एक स्टंट-आधारित रियालीटी शो आहे. आणि याचा 15 वा सीझन सध्या सुरु आहे. आणि यातील काही स्पर्धक घरा बाहेर गेले होते. मात्र  टीव्ही सुपरस्टार गौरव खन्नाला या शो मध्ये येण्याची पुन्हा संधी दिली आहे असे दिसुन येत आहे. कारण आगामी एपोसोडच्या एका झलक व्हिडीओमध्ये हा अभिनेता शोमध्ये पुन्हा प्रवेश केलेला दिसुन येत आहे. यात तो एक स्टंट करताना दिसुन येत आहे. त्यामुळे असे कळते की त्याचा अजुन यातील प्रवास संपलेला नाही. 

गौरव खन्ना (Khanna)याचा मागील एलिमिनेशन टास्क दरम्यान, तो दुर्दैवाने जखमी झाला होता आणि त्याला टास्क अर्धवट सोडावा लागला होता. हा टास्क म्हणजे एका फिरणाऱ्या अरुंद पुलावरुन उडी मारायची होती. तसेच वेगवेगळ्या रंगांचे झेंडे गोळा करून ते योग्य ठिकाणी लावायचे होते. दोन्ही पूल पाण्यापासून खूप उंचावर टांगलेले असल्यामुळे, तोल सांभाळणे हे काम खूप कठीण होती. गौरवने या टास्कची सुरुवात खुप चांगल्या प्रकारे केली मात्र क्षणासाठी त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. त्यामुळे त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती.

गौरव खन्ना यांच्य या कमबॅकने त्याचे अनेक चाहते आता खुश झाले आहेत. रोहीत शेट्टी यांनी जरी अधिकृत पणे गौरव खन्नाच्या कमबॅम बाबत बोलले नसले तरी प्रोमो मधुन त्याच्या परतीबाबत कळुन येत आहे.

हेही वाचा

रहस्यमयी मंदिरावर आधारित आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत ‘द वन’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

हे देखील वाचा