साउथ सुपरस्टार यश याचे आतापर्यत अनेक चित्रपट आले आणि ते गाजलेसुध्दा आणि आता सध्या त्याचा चित्रपट टॉक्सिक: अ फेअरिटेल फॉर ग्रोन-अप्स हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर सुरुवातीला कमाई उत्तम केली, मात्र नंतर या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट होताना दिसली. तर यश या चित्रपटाने 101 कोटीहुन जास्त सुरुवातीलाच कमाई केली होती. तर मंगळवार प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी चित्रपटाने 8.20 कोटी कमावले. तर अनेक दिग्गज कलाकारांनी अभिनेता यशचे या चित्रपटांच्या भुमिकेबाबत कौतुक देखील केले.
“टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स” या चित्रपटाला प्रदर्शित होउन 1 आठवडा झाला आहे. चित्रपटाची सुरुवात ही कमाईच्या बाबतीत दमदार झाली होती. मात्र आता ही गती मंदावली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 101.1 कोटी रु कमावले होते. जे धुरंधर या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाई पेक्षा जास्त आहे. या चित्रपटाचे ओपनिंगचे कमाईचे श्रेय अभिनेता यश याला जाते.
‘टॉक्सिक’ (toxic)च्या जगभरातील कमाईमध्ये आंतरराष्ट्रिय बाजारपेठेनेही महत्तपुर्ण योगदान दिले आहे. या चित्रपटाने परदेशात पहिल्या दिवशी रु 20 कोटी केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 8 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 3.5 कोटी कमावले आहेत. पाचव्या दिवसाच्या अखेरिस त्याची परदेशातील एकुण कमाई 29.25 कोटीवर पोहचली होती तर सहाव्या दिवशी त्यात आणखी कोटींची भर पडली. तर सातव्या दिवशी 40.75 कोटींवर पोहोचली. तर सातव्या दिवशीच्या आखेरेस एकुण कमाई अंदाजे 135 कोटी होती.
हेही वाचा
‘मिर्झापूर: द मूव्ही’ मधील या गाण्याची जोरदार चर्चा, लवकरच चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला










