बादशाहची एक्स पत्नी ईशा रिखीने बिग बाॅस 20 मध्ये प्रवेश केला आहे. रॅपर बादशाहपासुन नुकताच ईशाने घटस्फोटाची घोषणा केली आहे. आणि त्यानंतर तिने लगेच करिअरमधील हे मोठे पाउल उचलले आहे. 31 ऑगस्ट रोजी बादशाहने त्याचे हे पाच महिन्याचे वैवाहिक जीवनाचा शेवट करण्याची घोषणा केली होती. याचे लग्न गपचुप झाले होते आणि बादशाहने त्याच्या पोस्टही जास्त कधी केल्या नाहीत. आणि काही आठवड्यापासुन त्यांच्या नात्यात काहीसा दुरावा आला आहे. असे बादशाहच्या पत्नीच्या पोस्ट वरुन समजुन येत होते. अन या दरम्यान, ‘बिग बॉस सीझन 20’ च्या ग्रँड प्रीमियरमध्ये सलमान खानने ईशा रिखीला पुढे जाण्याचा सल्ला दिला.
बादशाहपासुन वेगळी झाल्यापासुन नुकतच ईशा रीखी चर्चेत आली आहे. आणि ती आता सलमान खानच्या ‘बिग बॉस 20’ या रिॲलिटी शोमध्ये दिसणार आहे. ग्रँड प्रीमियरमध्ये ईशाने बादशाहचे नाव घेतले नाही, परंतु त्यांच्या विभक्त होण्याने ती किती खचली होती. तसेच सलमान खानने तिचे सांत्वन केले आणि तिला पुढे जाण्याचा सल्ला दिला. तसेच तीने परिचय व्हिडिओमध्ये, ईशाने बॉलिवूड आणि पंजाबी सिनेमात काम करत असतानाच्या काळाची आठवण सांगितली आणि तो तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम टप्पा असल्याचे म्हटले. मात्र, ईशाच्या आयुष्यातील एक मोठे वळण तेव्हा आले, तिला लग्न करुन उत्तम संसार करायचा होता मात्र काही अनुभव व्यक्तीला बदलुन टाकतात.
या दरम्यान ईशा (isha)रिखी म्हणाली की, जेव्हा तुमचा विश्वास तुटतो तेव्हा तुम्ही अशा टप्प्यावर येउन पोहचता जिथे तुम्हाला प्रश्न पडतो की, माझ्याकडुन कुठे चुक झाली आहे का मी कोणत्या गोष्टींना सामोरे गेले. त्यामुळे मी पूर्णपणे खचले. मला त्याबद्दल आणखी काही बोलायचे नाही. तसेच सलमान खानने तीला आधार देला आणि तु आता तुझ्या प्रतिस्पर्धींवर लक्ष केंद्रित कर असा सल्ला दिला.
हेही वाचा
‘मिर्झापूर द मुव्ही’चा बाॅक्स ऑफिसवर धुमाकुळ, प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कमावले इतके कोटी रुपये










