समय रैना हा एक उत्तम काॅमडीय आहे. आणि तो त्याच्या कामाबाबत अथवा त्याच्या वैयक्तिक बाबींमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. अलीकडे तो डेटिंगच्या अफवांमुळे चर्चेत आला आहे. समय रैना आणि मेधा शंकर हे दोघे जण 2026 मध्ये लग्न करणार आहेत. याबाबत रेडिटवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. पण या बाबींवर समयने आता विनोदी प्रतिक्रिया दिली आहे.
समय (samay) रैनाने मेधा शंकरसोबतच्या लग्नाच्या सुरु असलेल्या अफवांना फेटाळुन लावल्या आहेच. समय रैनाने काही वेळापुर्वीच त्याच्या इंस्टा आंकाउटवर एक पोस्ट पुन्हा शेअर करत एका मजेशीर पध्दतीने शेअर केले आहे. समय रैना डिसेंबर मध्ये मेधा शंकरशी लग्न करणार का.. हि पोस्ट शेअर करत समयने ‘झूठ बोले कौवा काटे’ हे गाणेही वाजवले आहे. आणि लग्नाच्या अफवा फेटाळत समयने गंगतीने लिहिले, माझा डिसेंबर मध्ये भारत दौरा आहे, माफ करा पुढे ढकलावा लागेल.
तसेच मेधाने समयची पोस्ट पुन्हा शेअर करत, त्यात काही हाहा इमोजी जोडले आहेत. तसेच तिने आणखी एक पोस्ट शेअर करत या सर्व अफवा पुर्णपणे निराधार आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ते दोघे डेट करत असल्याच्या अफवा बऱ्याच कळापासुन पसरत आहेत. मात्र ते नात्यात असल्याची पुष्टी कोणीही केलीली नाही.
कामाबाबत पाहायचे झाल्यास समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो उत्तम सुरु आहे. मात्र मागील वर्षी काही वक्तव्यवरुन समय वादात आला होता मात्र तो आता या वर्षात उत्तम शो करत आहे. त्यामळे तो आता या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.
हेही वाचा
गौरव खन्ना आकांक्षा चमोला एकाच ठिकाणी, मात्र एकमेकांकडे पाहणंही टाळलं ?










