शाहरुख खानने अनेकदा सांगितले आहे की त्याचा परिवार अनेक प्रकारचे, धर्माचे सण एकत्र साजरे करतात. दिवीळी असो किंवा ईद ते नेहमीच परिवारासोबत एकत्र येउन सण साजरा करतात. तसेच अभिनेता शाहरुख खान हा दर चतुर्थीचा उपवास हि करतो. तसेच तो गणेशोत्सवादरम्यान मुंबईचा राजा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या प्रसिध्द लालबागच्या राजाला भाविक आणि सेलिब्रिटिंकडुन दर्शन दिले जाते. त्यातील अंबानी कुटुंब,रणवीर सिंग, जेनेलिया डिसूझा, रितेश देशमुख आणि जॅकी भगनानी यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी भेट दिली आहे. आणी आता अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना याच्या सोबत तो लालबागच्या राजाच्या दरबरात पोहोचला.
शाहरुखने पारंपारिक निळ्या कलरचा कुर्ता घातला होता. तर त्याने बाप्पाचे दर्शन घेतले आणि हात जोडुन नमस्कार केला या वेळी तो अगदी भक्तीमध्ये पुर्णपणे मग्न दिसला. यावेळी गौरी खान पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये, तर सुहाना खान हिरव्या रंगाच्या सूटमध्ये दिसल्या. शाहरुख खान आपल्या कुटुंबासह लालबागच्या राजाला भेटायला पोहोचताच सुपरस्टारलाही पाहण्यासाठी गर्दी जमली.
शाहरुख खान (Khan)पारंपरिक निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये लालबागच्या राजाच्या दरबारात पोहोचला. कपाळावर टिळा लावलेला किंग खान बाप्पाच्या भक्तीमध्ये पूर्णपणे मग्न दिसला. बाप्पाच्या दरबारात पोहोचल्यावर, त्याने बाप्पासमोर हात जोडले आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नतमस्तक झाला. यावेळी गौरी खान पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये, तर सुहाना खान हिरव्या रंगाच्या सूटमध्ये दिसल्या. शाहरुख खान आपल्या कुटुंबासह लालबागच्या राजाला भेटायला पोहोचताच, तिथे उभ्या असलेल्या भक्तांच्याही तो नजरेत आला, ज्यामुळे सुपरस्टारभोवती गर्दी जमली.
या वेळी अनेकजण शुट करत होते. आणि त्याने अनेक कॅमेराकडे हात हालवत स्मित हास्य केले, तर यावेळी त्याच्यासाठी कडक सुरक्षक व्यवस्था राबवली होती. त्याने आपल्या परीवारीला या गर्दीतुन सावकाश बाहेर काढले.
शाहरुखनच्या कामाबाबत पाहायचे झाल्यास त्याचा आगामी चित्रपट किंग हा या वर्षाच्या आखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन आणि अभय वर्मा यांसारखे कलाकारही दिसणार आहेत.
हेही वाचा
समय रैना-मेधा शंकर याचं डिसेंबर 2026 मध्ये लग्न? अफवांवर कॅामेडियनने दिली मजेशीर प्रतिक्रिया










