‘लव्ह अँड वॉर’ हा एक बहुप्रतिक्षीत चित्रपट आहे. आणि या चित्रपटाच्या एक झलकसाठी प्रेक्षक आतुर होते. तर आता प्रेक्षकांची आतुरता संपणार आहे. कारण नुकताच या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. या चित्रपटातील रणबीर कपुरचा फस्ट लुक समोर आला आहे. या पोस्टर मध्ये अभिनेत्याचा दमदार लुक समोर आला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल या सारखे माठे कलाकार यात आहेत. आणि ते या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र दिसणार आहेत.
या चित्रपटातील रणबीरचा लुक जो पोस्टरच्या माध्यमातुन सोशल मिडीयावर रिलीज झाला आहे. आणि या लूकमध्ये रणबीर त्याच्या पूर्वीच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळा दिसत आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या कथानकाबद्दल जास्त माहिती दिलेली नाही. तरीही आता या पोस्टरच्या त्यामागील गाण्यामुळे माध्यमातुन चित्रपटाबाबतची उत्सुकता आजुन वाढली आहे.
निर्मात्यांनी हा पोस्टर सोशल मिडियावर शेअर केला असुन, त्यांच्यासोबत लिहिले आहे की, तो दर्जा, तो जोश, आणि यासोबत म्हणले आहे, लव्ह अँड वाॅर 21 जानेवारी 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमिळ, हिंदी, आणि तेलुगू भाषेमध्ये रीलिज होणार आहे. या चित्रपटाचा पहिला दमदार लुक पाहुन प्रेक्षक आता पुढील अपडेट बाबत उत्सुक आहेत.
‘लव्ह अँड वॉर’मध्ये रणबीर कपूर,(Kapoor) आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. हे तिन्ही कलाकार संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाती अजुन या व्यतिरिक्त कोणत्याच कलाकाराबाबत आणि कथेबाबत कोणतेही अपडेट समोर आणलेली नाही.
हेही वाचा
‘कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही…’ तुकाराम मुंडे यांचा चित्रपट कलाकारांना इशारा,


