Saturday, September 26, 2026
Home › बॉलीवूड › भाभी तबाही मध्ये यामी गौतमचा देसी अंदाज, नय्यी नवेलीच्या गाण्याची सर्वत्र चर्चा

भाभी तबाही मध्ये यामी गौतमचा देसी अंदाज, नय्यी नवेलीच्या गाण्याची सर्वत्र चर्चा

यामी गौतम हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती तिच्या चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत असते आणि आता तिचा एक नवा चित्रपट येतोय, तो चित्रपट म्हणजे ‘नय्यी नवेली हा आहे. आणि या चित्रपटच्या सुरुवातीला भाभी तबाही या गाण्याच्या माध्यमातुन मोहीनी महिनी म्हणजेच यामी गौतमीची ओळख होते. भाभी तबही हे गाणे जी. व्ही प्रकाश कुमार यांनी संगीतबध्द आणि निर्मीत केले आहे. वायु यांनी लिहिलेले आणि नीती मोहन यांनी हे गाणे गायले आहे. तर यात यामी नवीन वहिनी म्हणुन कुटुंबात प्रवेश करते.

यातील यामीची एन्ट्री जबरदस्त दाखवली आहे. ती जेव्हा नव्या घरी प्रवेश करते तेव्हा  भांगडा, रॅप, शास्त्रीय आणि हिप-हॉप यांचे मिश्रण सादर करते. तर या दरम्यान भाभी तबाई हे गाणे मोहीनीची एक झलक दाखवते. आणि या गाण्यामुळे यामीची यातील भुमिका आणखी खास दाखवते आणि यातील या गाण्यामध्ये यामीच्या नृत्याची उत्तम झलक  पाहायला मिळते.

या चित्रपटात यामी (yami)व्यतिरीक्त आदिनाथ एम. कोठारे, अनुराग ठाकूर, सुनीता राजवार, मीता वशिष्ठ, आदित्य कुलश्रेष्ठ, सुष्मिता मुखर्जी, सोनल झा, सुनील सिन्हा, प्रतीक पचौरी, अक्षत सिंग, बबिता पांडे, अजय पाल आणि नीरज सिंग यांचाही समावेश आहे. आणि हा चित्रपट १६ ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहात रिलीज होत आहे. ज्यांना कौटुंबिक मनोरंजनपट आवडतात त्यांनी हा चित्रपट आवर्जुन पाहावा.

हेही वाचा

परिणीती चोप्राने सांगितल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीतील वेदना, स्वतःच्या चुकांचाही केला खुलासा

हे देखील वाचा