साई पल्लवी, रणबीर कपुर, रवी दुबे आणि यश हे त्याच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित या 4000 कोटीच्या चित्रापटाने प्रंचड उत्सुकता निर्माण केली आहे. आणि प्रेक्षक आता या चित्रपटासाठी प्रंचड उत्सुक आहेत. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. आणि यादरम्यान अभिनेता यशने सीतेच्या भुमिकेत दिसणाऱ्या त्याची सह अभिनेत्री साई पल्लवीचे कौतुक केले.
नुकतच बंगळुरुमध्ये झालेल्या एका तेलुगु प्री रीलीज कार्यक्रमादरम्यान यशने साई पल्लवीच्या सातेची भुमिका साकारण्याच्या पध्दतीबाबत सांगितले. तो म्हणाला की साई पल्लवी एक भक्त आहे. ती इतकी समर्पित आहे की जेव्हाही तिला संधी मिळते तेव्हा ती सीतेचे स्मरण करते. आम्ही तिला सेटवर काम करताना पाहिले आहे. माता सीतेची भुमिका साकारण्यासाठी साई (sai)पल्लवीमध्ये सर्व गुण आहेत. जिथे रणबीर कपुर प्रभु रामाची करत आहेत. आणि पुन्हा साई पल्लवीबाबत म्हणाला की, तीची देवावर खुप श्रध्दा आहे. आणि ती माता सीतेती भुमिका साकारत आहे. याचा मला अभिमान आहे. तिच्या मध्ये ती प्रतिभा आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, रामायणच्या निर्मात्यांनी घोषणा केली की, या चित्रपटाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आणि पहिला भाग हा 5 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. तर दुसरा भाग हा 2027 मध्ये रीलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, रवी दुबे, असे दिग्गज कलाकार यात दिसणार आहेत. तसेच या चित्रपटाचे ऍडवन्स बुकिंग सुरु झाले आहे.
हेही वाचा
पत्नीच्या कॅन्सरच्या काळात नाना पाटेकरांनी दिली साथ, शिवाजी साटम यांनी सांगितल्या भावुक आठवणी










