गोविंदा हा एक लोकप्रिय बाॅलिवुड कलाकार आहे. त्याने आतापर्यत अनेक चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तर तो आता त्याच्या आगामी चित्रपटामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही काळापासुन त्याची पत्नी सुनीता आहुजा सोबतचे संबंध हे तणावपुर्ण झाल्याचे दिसत आहेत. तसेच कोमल राणी आणि गोविंदाच्या जवळीकतेचे संबंध असल्याचे सतत चर्चा सुरु आहे. यादरम्यान आता कोमल राणी हिने गोविंदा आणि तिच्या आगामी चित्रपटातील फोटो शेअर केले आहेत. हा फोटो पाहुन अनेकजणांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे तर काहीनी टीका केली आहे. तसेच राखी सांवत हीने कमेंट बाॅक्स मध्ये अनेक रागीष्ट इमोजी राकले आहेत.
कोमल (komal)राणी हिने गोविंदा सोबतचे फोटो नुकतेच शेअर केले असुन या फोटो मध्ये ते एकत्र पोज देताना दिसत आहेत. कोमलने सुंदर साडी परिधान केलीली दिसत आहे तर अभिनेता गोंविदाने उत्तम शर्ट घातला होता. तर कोमलने फोटो शेअर करताच अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधुन घेतले, कलाकारांनी या फोटोला उत्तम प्रतिसाद दिला. पण राखी सांवतने मात्र लाल रंगाचे रागाचे इमोजी शेअर केले होते. राखी सावंतने यापूर्वी सुनीता आहुजाला पाठिंबा दिला आहे आणि गोविंदाला अनेक वेळा जाहीरपणे फटकारले आहे.
कोमल राणी आणि गोविंदा अनेकदा एकत्र दिसले आहे. विमानतळावर आणि लालबागच्या दर्शनाला ते अनेकंदा एकत्र दिसले त्यामुळे सुनीता अहुजाने त्यांच्यावर अनेक आरोप केले. त्यानंतर गोंविदा सांगितले की आमचे नाते हे पुर्णपणे व्यावसायिक आहे. एका चित्रपटामध्ये काम करत असल्याने प्रमोशनसाठी ते एकत्र दिसले होते. मात्र तरीही गोविंदा आणि सुनीता याच्या नात्यात दरी आली असुन मध्यांतरी त्याच्या घटस्फोटाच्या अफवा समोर आल्या होत्या.
हेही वाचा
जान्हवी कपूर कधी घेणार सात फेरे? अभिनेत्रीने केला लग्नाबाबत खुलासा










