Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड बाप- लेकीची जोडी पुन्हा चर्चेत! जेवायला गेल्यावर अनुराग कश्यपच्या मुलीने कष्टाच्या कमाईतून भरले बिल

बाप- लेकीची जोडी पुन्हा चर्चेत! जेवायला गेल्यावर अनुराग कश्यपच्या मुलीने कष्टाच्या कमाईतून भरले बिल

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्याची मुलगी आलिया कश्यप हे मागील काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. मागील काही दिवसापासून त्या दोघांचा यूट्यूबवर व्हिडिओ व्हायरल होत होता. आता देखील या बाप लेकीच्या जोडीबद्दल एक बातमी समोर आली आहे. अनुराग कश्यप याने सोमवारी (28 जून) दुपारी आलियासोबतची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. ते दोघे लंच डेटवर गेले होते, तेव्हा आलियाने त्या दोघांचेही बिल भरले. त्याने हा क्षण इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

त्याने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले की, “माझी मुलगी आलिया कश्यप मला आज दुपारी लंचला घेऊन गेली. तिने तिच्या यूट्यूबच्या कमाईतून जेवणाचे सगळे बिल भरले आहे. हा पहिला क्षण रेकॉर्ड करण्यासारखा आहे.”

या व्हिडिओमध्ये आलिया एका रेस्टॉरंटमध्ये तिचे कार्ड स्वाईप करत बिल भरताना दिसत आहे. जेव्हा ती बघते की, तिचे वडील व्हिडिओ बनवत आहेत, तेव्हा ती हसते आणि हात जोडून म्हणते की, “ठीक आहे पप्पा, लज्जित होऊ नका.”

आलिया केवळ 20 वर्षाची आहे. ती आता लाईफस्टाईल, फॅशन आणि ब्युटीवर एक यूट्यूब चॅनल चालवते. तिचे यूट्यूबवर 68.3 हजार सब्स्क्रायबर आहेत. या यूट्यूबवर इंडस्ट्रीमधील मित्र कमेंट करत आहेत.

हुमा कुरैशी, विकी कौशल, विनीत कुमार सिंग आणि बिदिता बाग यांनी प्रेम व्यक्त करत हार्टची ईमोजी पोस्ट केला आहे. गुलशन देवैयाने लिहिले की, “मी तुम्हाला सांगत आहे की, ती लवकरच तुमच्या चित्रपटांना यूट्यूबसाठी पैशाची मदत करणार आहे.”

मागील काही दिवसात अनुराग कश्यप आणि आलिया कश्यप यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये आलियाने अनुराग कश्यपला अनेक प्रश्न विचारले होते. तिने त्याला बॉयफ्रेंडपासून ते प्रेग्नंसीपर्यंत अनेक प्रश्न विचारले होते. त्यांना या व्हिडिओवरून जोरदार ट्रोल करण्यायात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: आपल्या बॉयफ्रेंडसोबत पॅपराजींच्या कॅमेऱ्यात अंकिता लोखंडे कैद; आनंदाने साधला त्यांच्याशी संवाद

-भोजपुरी अभिनेत्रीने नवीन गाण्यातून सांगितली बॉयफ्रेंड बदलण्याची नवीन पद्धत; व्हिडिओला १४ लाख हिट्स

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा