बॉलिवूडमध्ये फिटनेसला खूप महत्त्व आहे. हे आपल्याला बड्या बड्या अभिनेत्यांकडून आजही पाहायला मिळतं. पहिल्या सिनेमात एकदम फिट दिसणारा शाहरुख आजही अगदी तसाच फिट दिसतो. हा आता हे अभिनेते सिनेमातील भूमिकेनुसार स्वतःच्या शरीरात बदल करत असतात. भूमिकेची गरज असल्यावर वजन वाढवलेलं देखील आपण या कलाकारांना पाहिलेलं आहे. हेच कलाकार भूमिकेनुसार स्वतःला इतकं बारीक करतात की या कलाकारांच्या वयाचा अंदाज बांधणंसुद्धा कठीण होऊन बसतं. तर दुसरीकडे काही कलाकार असे आहेत जे फिटनेसच्या बाबतीत इतके गंभीर नसल्याने त्यांच्या सध्याच्या वयापेक्षाही जास्त वयाचे वाटतात. हा पण त्यांच्या अभिनयात मात्र कुठलीच कसर कुणाला शोधूनही सापडणार नाही हे नक्की! चला तर मग पाहुयात अशाच अभिनेत्यांच्या काही जोड्या जे आहेत एकाच वयाचे परंतु वाटत अजिबात नाहीत.
गोविंदा अहुजा – संजय मिश्रा
बॉलिवूडचा कुली नं १, हिरो नं १ असणारा गोविंदा हल्ली चित्रपटांमध्ये फारसा दिसत नाही. परंतु याउलट अभिनेते संजय मिश्रा हे गेल्या काही वर्षांपासून चित्रपटात सलग काम करत आहेत. त्यांनी साकारलेल्या भूमिका लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. एक काळ असा होता की गोविंदा बॉलिवूडवर राज्य करत होता. त्यामुळे गोविंदा मुख्य भूमिका सोडून सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारणं जवळपास अशक्य होतं. परंतु संजय मिश्रा हा इंडस्ट्रीत आल्यापासून सहाय्यक कलाकाराचीच भूमिका साकारत आला आहे. त्यात तो इतका निपुण झाला आहे की आज त्याची भूमिका ही त्याच्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल परंतु हो गोविंदा आणि संजय मिश्रा हे एकाच वयाचे आहेत. दोघांचंही वय हे ५७ वर्षे आहे.
शाहरुख खान – आदित्य पांचोली
शाहरुख खान या व्यक्तीबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच खरं तर! आणि बोलावं तरी काय कारण या अभिनेत्याबद्दल प्रत्येकाला जवळपास सगळ्याच गोष्टी ठाऊक आहेत त्यामुळे त्याच्या इतर गोष्टींवर आपण बोलणारच नाही आहोत. शाहरु ने ज्या पद्धतीने स्वतःच्या आयुष्याला एक शिस्तीमध्ये बांधलं आहे त्यामुळे तो आजही तितकाच फिट आहे आणि अजूनही बड्या बड्या अभिनेत्रींसोबत आपल्याला रोमान्स करताना दिसतो. परंतु त्याच्याबागडी उलट जर आपण पाहायला गेलो तर आदित्य पांचोलीची गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी आदित्य पांचोली चित्रपटांमध्ये मुख्य खलनायकाची भूमिका साकारत असे. परंतु आजमितीला आदित्य पांचोली आपल्याला कुठल्याच सिनेमात पाहायला मिळत नाही. पाहायला गेलं तर शाहरुख आणि आदित्य पांचोली हे एकाच वयाचे आहेत. दोघांचंही वय ५५ वर्षे आहे.
अक्षय कुमार – दिलीप जोशी
अक्षय कुमारचं फिटनेस तर जगजाहीर आहे. अक्षय कुमार दररोज भल्या पहाटे ३ वाजताच उठून चौपाटीवर धावण्यासाठी जात असतो. स्वतःच्या आहारावर नियंत्रण ठेवतो. त्याला कुठलंही व्यसन नाही. आणि म्हणूनच अक्षय इतका फिट आहे की तो वर्षाला चार सिनेमे करतो. अजूनही अक्षय बऱ्याचदा नायकाच्या भूमिकेतच पाहायला मिळतो. परंतु फिटनेसच्या बाबतीत या उलट परिस्थिती अभिनेते दिलीप जोशी यांची पाहायला मिळते. अच्छा दिलीप जोशी म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके जेठालाल! आता नक्कीच ओळख पटली असणार आपल्याला. असो हे दोघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. परंतु आपल्याला माहीत आहे का की दोघांच्या वयामध्ये फक्त काही महिन्यांचंच अंतर आहे.
हृतिक रोशन – राम कपूर
हृतिक रोशनची तर बातच न्यारी! हा हिरो जिथून बॉलिवूडमध्ये आला आहे तिथून आजपर्यंत अगदी जसाच्या तसा दिसतो आहे. इतकं त्याने स्वतःच्या फिटनेसवर लक्ष दिलं आहे. हृतिक हा भूमिकेनुसार स्वतःच्या वजनामध्ये वाढ वा घट करत असतो. याउलट अभिनेते राम कपूर यांच्याबाबतीत म्हणता येईल इंडस्ट्रीत आल्यापासून राम हे जरा जास्तच हेल्दी होते. परंतु त्यांनी सुद्धा फिटनेसचं महत्त्व जाणून त्यावर काम करायला सुरुवात केली आहे. परंतु आजही राम कपूर हे आपल्याला बॉलिवूडमध्ये वडीलांच्याच भूमिका साकारताना पाहायला मिळतात तर हृतिक अजूनही नवनव्या हिरॉइन्ससोबत स्क्रीनवर रोमान्स करतोय. दोघांचं वय हे एकच आहे म्हणजेच दोघेही ४७ वर्षांचे आहेत.
पूजा भट – मंदिरा बेदी
एकेकाळी बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारणारी पूजा भट दारूच्या इतकी आहारी गेली की ती स्वतःचं आरोग्य तर बिघडवून बसलीच सोबतच आता सिनेमांमधूनही गायब झाली आहे. या उलट मंदिरा बेदीचं आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपट दिसलेल्या मंदिराला आता आपण ओळखूही शकणार नाही इतकं तिने स्वतःला फिट ठेवलं आहे. स्वतःमध्ये बदल घडवून आणला आहे. पूजा आणि मंदिरा या देखील एकाच वयाच्या असून दोघींचं वय हे ४८ वर्षे आहे.










